पीएमआरडीएच्या १७२२ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी- रिंगरोड, नदी सुधार पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद

Date:

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)ची सहावी प्राधिकरणसभा मुख्यमंत्री,
देवेंद्र फडणवीस ,यांच्याअध्यक्षतेखालीसह्याद्री अतिथी सभागृह, मलबार हिल, मुंबई येथे शुक्रवारी संपन्न झाली.या
बैठकीमध्ये पीएमआरडीएच्या २०१९-२०च्या रुपये १७२२ कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. तसेच
यावेळी मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते.
सदर सभेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरनाच्या सन २०१९-२०साठीच्या एकूण रक्कम रुपये १७२२ कोटी १२
लक्ष इतक्या अंदाजपत्रकिय तरतुदीस आज रोजी मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये आरंभीची शिल्लक रक्कम रुपये ७९४
कोटी इतकी आहे. त्यामध्ये रिंग रोड प्रकल्पासाठी ५६९ कोटी, नदी सुधार व पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ३५ कोटी, टीपी
स्कीममधील विविध विकासकामासाठी ३२० कोटी, प्राधिकरण क्षेत्रात पूल, सबवे रस्त्याचे काम करण्यासाठी १२५
कोटी, हायपरलूपसाठी ५५ कोटी, व इतर योजनावरील खर्चासाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून
चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार
आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळासोबत परवडणाऱ्या घरांसाठी सयुंक्त
भागीदारी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ३ अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या नगर
रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर परवडणारी घरे “महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ”
सोबत सयुंक्त भागीदारी (Joint venture) तत्वावर बांधणेसाठीच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता मिळाली आहे. पुणे शहर
व महानगरातील नागरिकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी प्राधिकरणामार्फत नियोजनात्मक विकास व पायाभूत सुविधा
विकसित करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेसाठी एकूण १४ विविध ठिकाणी १३.३
हेक्टर क्षेत्रावर महाळुंगे-माण नगररचना योजनेच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उभी केली
जाणार आहेत.त्यासोबत रस्ते, वीज, गटारे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
– राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून हडपसर महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र.५६ रस्ता कॉंक्रीटीकरणद्वारे
चौपदरीकरणास मंजुरी
पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील वाहतूकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर
महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र.५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल साखळी क्र.३/४४ ते ५/१०० या
लांबीमध्ये कॉंक्रीटीकरणाद्वारे (एकूण १३.९१ किमी) चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या
कामकाजासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. सदर रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११०
मी. रुंद रिंगरोडच्या पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी, आव्हाळवाडी व वाघोली
या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे. सदर रस्त्याच्या विकास कामामुळे निवासी क्षेत्रास चालना मिळणार आहे.

त्याचप्रमाणे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून
करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना (financing models) पीपीपी या विकल्पावर व इतर तरतुदीसह मान्यता देण्यात
आली आहे.तसेच पीएमआरडीए हदीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापण
करण्यासाठी बृहत आराखडा (Master plan) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता मिळाली
आहे. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विकास
कंपनीमध्ये सहभागी (Equity Shares) होण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सदर बैठकीला मुख्यमंत्री यांच्या समवेत  प्रकाश मेहता, मंत्री गृहनिर्माण विभाग तथा सदस्य, पुण्याचे
पालकमंत्री  गिरीश बापट, अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव
संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महानगर
आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज
मांढरे यांचे सदस्य, पि.चिं.वि.न.पा. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...