Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सातशे एकरवर पीएमआरडीए उभारतेय महाळुंगे ‘हायटेक सिटी’ -पायाभूत सुविधेबाबत कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने सातशे एकरवर उभारल्या जाणाऱ्या महाळुंगे हायटेक
सिटीमध्ये विकसित केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा विकास कामांकरिता भूधारकांसमवेत पुणे, बालेवाडी मिटकॉन येथे दि.१६ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी १०.०० वाजता कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेला मा. महानगर आयुक्त किरण गित्ते, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, सहायक संचालक धनंजय खोत,उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, महाळुंगेचे सरपंच मयूर भांडे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळेकर,वरिष्ठ अभियंता अमित तिडके तसेच एसबीआय व आयसीसीआय बँकेचे प्रतिनिधी आदी कर्मचारी उपस्थित होते.
सुहास मापारी यांनी उपस्थितांना सांगितले की, ‘महाळुंगे नगररचना योजनेत ग्रामस्थांचा सिहांचा वाटा आहे. ५० टक्क्के परतावा यामाध्यमातून ग्रामस्थांना दिला जात आहे. चार ते पाच वर्षात टीपी स्कीमच्या महाळुंगे माणचा कायापालट झालेला दिसेल.’
महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून ‘महाळुंगे हायटेक सिटीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण
करण्यासाठी पीएमआरडीए सुमारे ६०० कोटी रुपये गुंतवणूकीच्या माध्यमातून विकास साधणार असल्याचे सांगितले. या भागात१२ मीटर ते ३६ मीटर रुंदीचे रस्ते, पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा व विविध नागरी सुविधांचा समावेशआहे. या भागात समाविष्ट टीपीस्कीम मधील भूधारकांना ४ एफएसआय मोबदला मिळणार असल्याचे सांगितले. हिंजवडी आयटीपार्कला जोडून महाळुंगे नगररचना असल्याने यामाध्यमातून खासगी व परदेशी गुंतवणूकदार या भागात आकर्षित होण्यास मदतहोईल.
लवादाची नियुक्ती झाल्यामुळे बऱ्याच अडचणी दूर होऊन सात ते आठ महिन्यात टीपी स्कीमचे प्रॉपर्टी कार्ड भूधारकांच्या नावे केलीजातील. संपूर्ण क्षेत्राचे झोननिहाय ९ भागात वर्गीकरण केले आहे. सर्व भूखंडाचे चिन्हांकान केले असून खांब रोवणीचे काम चालू आहे.
मागील एक वर्षात गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देउन पुढील प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनकरण्यात आले.

पीएमआरडीएमध्ये भूधारकांसाठी मोफत सल्ला केंद्र

महाळुंगे माण नगररचना योजना क्रमांक १ मधील जमीन धारकांना आपल्या भूखंडाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी
पीएमआरडीएमध्ये मदत कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे दर आठवड्याला कायदेशीर सल्ला, वास्तूविशारद सल्ला, व बँकअधिकाऱ्याचा सल्ला प्रत्येकी २ दिवस देण्यात येईल. यामुळे जमीन धारकांची फसवणूक टाळली जाईल. व आपले नियोजन करण्यास अचूकपणे मदत होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी...