पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या हदीतील अनधिकृत
बांधकामांची अचानक तपासणी करून कारवाईची धडक मोहीम अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. या
मोहिमेच्या माध्यामतून अनधिकृत बांधकामे प्रत्यक्ष पाहून कारवाई करणे सोपे जाणार आहे.
या अनधिकृत बांधकाम तपासणीची सुरुवात मांजरी बुद्रुक सर्व्हे नंबर १२७/१३२ मधून करण्यात आली आहे.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक,
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी या अधिकाऱ्यांसह अभियंते व कर्मचाऱ्यांनी ही धडक मोहीम राबविण्यास
सुरुवात केली आहे. या कारवाईकरिता पीएमआरडीए हद्दीतील काही परिसरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम तपासणी दरम्यान आढळून आलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून तात्काळ बांधकाम
थांबविण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात येणार आहेत. ज्या भागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत
अशा भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. हाती घेण्यात आलेल्या मोहिमेतून बांधकाम
करतेवेळी घेण्यात येणारी दक्षता तसेच बांधकाम परवानगी व नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
मा. आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा गुन्हे दाखल
करून लवकरच बांधकाम निष्कासनाची कारवाई केली जाईल. ही मोहीम अत्यंत कडकपणे राबविली जाणार
आहे. अनधिकृत बांधकामास वचक बसण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरेल. काही प्रमाणात अशा बांधकामांना
आळा बसेल. जी बांधकामे नियमनाकुल असतील ती बांधकाम परवानगी घेऊन नियमित करण्यात यावीत.
पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम तपासणीची धडक मोहीम हाती
Date:


