पुणे : पुणे परिवहन महामंडळाच्यावतीने येत्या काळात नवनवीन योजना सुरू करण्यात येणार असून पीएमपीएमएलची वाटचाल आत्ता ई बसेसकडे होणार आहे.पीएमपीएमएलच्या माध्यमातून नवीन पब्लिक चार्जिंग स्टेशन, ई कॅब सर्व्हिस तसेच महामंडळाच्या ताफ्यात आणखी 500 ई बसेस लवकर दाखल होणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, परिवहन महामंडळाचे माहिती व तंत्रज्ञान सल्लागार त्यांनी परिवहन महामंडळा करिता तयार केलेला बिझनेस प्लॅन अमलात आणण्यास संचालक मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. परिवहन महामंडळाकडील यापुढे नमूद खाजगी बस ठेकेदार यांनी महामंडळ विरुद्ध दाखल केलेल्या, लवाद दाव्यातील निर्णयानुसार तडजोडी रक्कम अदा करण्यास संचालक मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. एकुण 6 बस पुरवठादारांना 79 कोटी 92 लाख 46हजार 41 रुपये एवढे देण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.

