पीएमपीएमएलच्या वतीने चालक, वाहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना

Date:

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजनेची घोषणा करण्यात आली आहे. परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही घोषणा केली.या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महामंडळाच्या 13 आगारांमधील प्रत्येकी एक चालक, एक वाहक, वर्कशॉप विभागातील एक कर्मचारी यांच्यासह सर्व आगारांमधून एक आगार व्यवस्थापक, एक आगार अभियंता यांना तसेच चेकर टीम व विभाग प्रमुख यांना सन्मानपत्र, रोख रकमेचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. या बक्षिसासाठी निवड करताना वर्षभरातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.

ध्वजारोहणानंतर 18 चालक सेवकांचा व प्रशासन विभागातील 1 लिपिक अशा 19 सेवकांचा सत्कार करण्यात आला. जब्बार पटेल, छगन शेळके, तात्याबा हगवणे, योगेश जमदाडे, सुनील डोंगरे, विनोद माने, गणेश गर्जे, सच्चिदानंद कदम, सचिन खोपडे, स्वप्नील गाढवे, संतोष जगदाळे, संजय पासंगे, रामदास मेदगे, विकास गागडे, निरंजन ढगे, प्रकाश विघ्ने, संदीप बोंगाणे, राजू भालेराव या चालकांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...