पुणे-पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रा निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर अशी बससेवा दिनांक २१/१२/२०२१ ते २८/०२/२०२२ या कालावधीत दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी १ जादा बस सोडण्यात येणार आहे.
सध्या कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर पीएमपीएमएल च्या ६ बसेस दर २५
मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु आहेत. या ६ बसेस व्यतिरिक्त १ जादा बसचे नियोजन दिनांक २१/१२/२०२१ ते २८/०२/२०२२ या कालावधीत दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी करण्यात आले आहे. तसेच पुणे सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान बसस्थानकावरून बसमार्ग क्र. ६१- कात्रज सर्पोद्यान ते सारोळा, मार्ग क्र. २९३- कात्रज सर्पोद्यान ते बालाजी मंदिर (केतकावळे), मार्ग क्र. २९६- कात्रज सर्पोद्यान ते विंझर व मार्ग क्र. २९६अ- कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गावर संचलनात असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्यापर्यंत जाणेसाठी सरासरी १० मिनिटे वारंवारीतेने उपलब्ध आहेत. तरी कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.
पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रेनिमित्त १ जादा बसची सोय
Date:

