पुणे-पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने शुक्रवार, दि. ८ जुलै २०२२ रोजी पंढरपूर नजीक बाजीराव विहिरीजवळ भव्य वारकरी अन्नदान सोहळा पार पडला. दरम्यान दि. ७ जुलै २०२२ रोजी कात्रज आगारामध्ये पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती प्रज्ञा पोतदार, वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे, कात्रज आगार व्यवस्थापक श्री. गोविंद हांडे यांच्या हस्ते अन्नधान्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद व कात्रज आगारातील कर्मचारी उपस्थित होते. पूजनानंतर अन्नधान्याचा ट्रक पंढरपूरला रवाना झाला. दि. ८ जुलै २०२२ रोजी सकाळी ६.४५ वा. अन्नदानाचा (बेसनभात) नैवेद्य श्री. बबनराव झिंजुर्डे यांचे हस्ते दाखवून
अन्नदानास ७ वा. सुरूवात झाली. सकाळी ७ ते सायं. ७.३० पर्यंत अन्नदान करणेत आले. एकूण ३६,००० वारकरी व वारकरी सेवेतील कर्मचाऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेतला. वारकरी सेवेत सर्व कार्यकत्र्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
श्रीमंत सेवा प्रतिष्ठान तर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. गेली आठ वर्षे वारकऱ्यांसाठी अन्नदान सोहळा उपक्रम राबविला जात आहे.
पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य वारकरी अन्नदान सोहळा संपन्न
Date:

