महापौरांच्या सांगण्यावरून पीएमपीएल अध्यक्षांच्या संगणकाची छेडछाड-पीएमपीएलचे अधीकृत स्पष्टीकरण

Date:

पुणे- काल दुपारी पुण्यातील पीएमपीएल च्या कार्यालयात झालेला प्रकार पोलिस चौकीत तक्रार जाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर आज या प्रकरणाचा घटनाक्रम पीएमपीएमएल ने अधिकृतपणे माध्यमांना कळविला आहे ,या नुसार पीएमपीएल च्या अध्यक्षांच्या गैरहजेरीत त्यांच्या दालनातील त्यांचा संगणक सुरु करून त्यातील रेकॉर्डिंग कसे काढता येईल हे विचारून ते बरोबर घेऊन या असे सांगून महापौर निघून गेले आणि त्यानंतर महापालिकेचे सेवक असलेल्या कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे या दोघांनी या संगणकाशी छेडछाड केली .याबाबत तातडीने अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी हे गैर असल्याचे सांगितले आणि अध्यक्षांना याबाबत फोन वरून कल्पना दिली तेव्हा अध्यक्षांनी याबाबत त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याची सूचना दिल्याचे या खुलाशात नमूद करण्यात आले आहे .

पहा,वाचा हा खुलासा आणि घटनाक्रम जो पीएमपीएल प्रसिद्धीसाठी पाठविला आहे .

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी दिनांक ०४/०६/२०२१ रोजीचा घटनाक्रम व खुलासा दिलेला आहे तो खालीलप्रमाणे-
दिनांक ०४/०६/२०२१ रोजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक घरगुती कारणास्तव एक
दिवसाच्या किरकोळ रजेवर असताना महामंडळाच्या कार्यालयात घडलेला प्रकार पुढील प्रमाणे
दिनांक ०४/०६/२०२१ रोजी मा.महापौर, पुणे मनपा हे महामंडळाच्या मुख्यालयातील संचालक यांचे दालनात दु. १२.३० चे दरम्याने आले असता त्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक व कंपनी सेक्रेटरी तथा विधी अधिकारी यांना संचालक यांचे दालनात बोलावून घेवून दि. ०१/०६/२०२१ रोजी संपन्न झालेल्या संचालक मंडळाचे बैठकीतील वृत्तांताची प्रत व रेकॉर्डिंग मिळणे विषयी विनंती केली असता सहव्यवस्थापकीय संचालक व कंपनी सेक्रेटरी तथा विधी अधिकारी यांनी इतिवृत्तांत अंतिम करण्याचे कामकाज चालू असुन तो अंतिम झालेनंतर आपणास त्वरित देणेत येईल असे सांगितले.सदर बैठकीमध्ये शंकर पवार यांच्या राजीनाम्याबद्दल केलेला उल्लेख त्यांनी केलेला नसुन व्हेरिफाय करणेकरीता बैठकीचे रेकॉर्डींग मिळणे विषयी विनंती केली असता रेकॉर्डींग प्रक्रीया ही ऑन लाईन केली असल्याने व ते अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे दालनातील संगणकावर असल्याने व सदरील रेकॉर्डींग हे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रारूप इतिवृत्त तपासणीकामी घरी नेल्याने संगणकामध्ये सदरील रेकॉर्डींग उपलब्ध नाही ते अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचेकडून प्राप्त करून घेऊन ते आपणास
उपलब्ध करून देण्यात येईल याबद्दल सहव्यवस्थापकीय संचालक व कंपनी सेक्रेटरी तथा विधी अधिकारी यांनी महापौर, पुणे मनपा यांना स्पष्टता दिली.
तदनंतर संचालक श्री.शंकर पवार व महापौर, पुणे मनपा हे त्यांचे समवेत आलेल्या कैलास त्रिवेदी
व राहुल ताथवडे यांना घेऊन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे दालनात गेले तसेच संगणकावरील झूम चे रेकॉर्डींग कसे काढता येईल याची विचारणा त्यांचे बरोबर आलेल्या व्यक्तिंना केली व रेकॉर्डींग सोबत घेवून येणे विषयी सुचित करून महापौर, पुणे मनपा हे निघुन गेले.

तदनंतर कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे ह्या दोन व्यक्तींनी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे कार्यालयातील संगणक चालू करण्याचा प्रयत्न केला असता सहव्यवस्थापकीय संचालक यांनी सदरचे रेकॉर्डींग हया संगणकावर उपलब्ध नसुन संगणकावर छेडछाड न करणे विषयी सांगितले. तसेच संगणक चालू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदरची बाब गंभीर असल्याचे कारणास्तव सदरील घटनेचा वृत्तांत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दुरध्वनीवरून दिला.. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सुरक्षा अधिकारी यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणे कामी सुचित केले असता रखवालदार श्री.अरीफ हुसेन तांबोळी यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.
कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे हे दोघेही पुणे मनपाचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची माहिती आयुक्त, पुणे मनपा यांना देण्यात आलेली आहे.
महापौर यांना सदरचे रेकॉर्डींग घेऊन जाण्याबाबत मेसेज दिला होता परंतु महापौर कार्यालयातून
अद्याप पर्यंत सदरची माहिती घेऊन जाणेकामी कोणीही आलेले नाही. तसेच दि.०४/०६/२०२१ रोजी सायंकाळी सर्व संचालक यांना बैठकीचे रेकॉर्डींग मेल करण्यात आले आहे.
सदरच्या घटनेचा सविस्तर अहवाल परिवहन महामंडळाकडून राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...