Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विद्युत व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीसाठी ‘पीएमआय’तर्फे पुण्यात कारखान्याची पायाभरणी

Date:

·         पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये २५० एकरांत२५०० विद्युत व्यावसायिक वाहने तयार करण्याची सुविधा २०२३पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना.

·         पीएमआयच्या ५०० विद्युत व्यवसायिक वाहनांनी आतापर्यंत व्यापला ९५ लाख हरीत किलोमीटर इतका मार्गतसेच वाचविले सीओटूचे ५५०० मे.टन उत्सर्जन.

नवी दिल्ली, : भारतात विद्युत बसचे उत्पादन करणारी ‘पीएमआय’ ही आघाडीची कंपनी आता पुण्यात आपला सर्वात मोठा विद्युत व्यावसायिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारत आहे. कंपनीतर्फे आज ही घोषणा करण्यात आली. चाकणच्या औद्योगिक वसाहतीत ३५ एकरात उभ्या राहणाऱ्या या कारखान्यात सुमारे १५०० कर्मचारी काम करतील. हरीत बांधकामांविषयीच्या नियमांचे पालन करणारा हा कारखाना ऑगस्ट २०२३पर्यंत कार्यान्वित होईल. दरवर्षी २५०० विद्युत व्यावसायिक वाहने तयार करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्यात ऑक्टोबर २०२३पासून व्यावसायिक उत्पादन सुरू होईल.

विद्युत वाहनांचे बहुविध प्रकार, तसेच विद्युत ट्रक यांचे उत्पादन करण्यास हा कारखाना सक्षम असेल. ‘पीएमआय’च्या दिल्ली एनसीआर येथील कारखान्यात वर्षाकाठी १५०० विद्युत बसेस बनविण्याची क्षमता आहे. आता पुण्यात होणाऱ्या विस्तारामुळे, ‘पीएमआय’ची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ४००० विद्युत व्यावसायिक वाहनांपर्यंत वाढेल.

या आगामी कारखान्याच्या पायाभरणी समारंभानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार जैन म्हणाले, “पुण्यातील कारखान्याच्या निमित्ताने आमच्या वाढीच्या पुढील टप्प्याची पायाभरणी करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. ‘मेक-इन-इंडिया’ आणि ‘मेक-फॉर-इंडिया’ या सरकारच्या कार्यक्रमांमध्ये योगदान देत जागतिक स्तरावर अग्रगण्य विद्युत व्यावसायिक वाहन उद्योग बनण्याचे आमचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यात या कारखान्याची आम्हाला मदत होईल. कार्बनचे शून्य-उत्सर्जन असणारी व्यावसायिक वाहने बनविणारी प्रणेती कंपनी अशी आमची ओळख आहे. स्वच्छ ऊर्जेद्वारे चालणारी व्यावसायिक वाहने ही शाश्वत गतिशीलतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, यावर आमचा ठाम विश्वास आहे. या विशिष्ट उद्योगाच्या भविष्यातील वाढीसाठी आम्ही सक्रियपणे योगदान देऊ इच्छितो आणि भारत सरकारने घालून दिलेले शाश्वततेचे लक्ष्य साध्य करू इच्छितो.”

पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कारखाना उभारल्यामुळे, न्हावा-शेवा बंदराची सुविधा, तसेच पुण्यातील पुरवठा-साखळी परिसंस्था यांचा लाभ कंपनीला घेता येईल. तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या देशाच्या पश्चिम / मध्य / दक्षिण भागांतील प्रमुख बाजारपेठांसाठी लॉजिस्टिक्सचा फायदाही होईल.

या कारखान्याच्या रचनेमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आणि किफायतशीर उत्पादन पद्धती यांचे योग्य ते संयोजन साधण्यात येणार आहे. त्यातून सर्वोत्तम दर्जाची गुणवत्ता, इष्टतम श्रम उत्पादकता, त्वरीत येणाऱ्या ऑर्डर्ससाठी जलद प्रतिसाद आणि मालमत्तेच्या उलाढालीचे उच्च प्रमाण या गोष्टी साधता येतील.

पर्यावरणपूरक व्यावसायिक वाहनांचे डिझाईन व त्याचे तंत्रज्ञान या बाबी भारतात आणता याव्यात, याकरीता ‘पीएमआय’ने ‘फोटॉन’ या जागतिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीसोबत सहयोग / भागीदारी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...