पुणे, 14 मार्च: कोविडच्या साथीमुळे सुमारे दोन वर्षांसाठी टेनिसचा सराव आणि स्पर्धांना मुकल्यानंतर पीएमडीटीए यांच्या वतीने व एमएसएलटीए यांच्या सहकार्याने सुमारे डझनभर राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यामुळे पुन्हा एकदा एका व्यस्त वेळापत्रकाचा आनंद घेता येणार आहे. पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, भारतीय टेनिसचा केंद्रबिंदू असलेल्या पुणे जिल्ह्यात 8 चॅम्पियन सिरीज(7 दिवसीय) टेनिस स्पर्धा, 4 सुपर सिरीज टेनिस स्पर्धा आणि 1 आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय एप्रिलमध्ये पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने लेव्हल 4 आयटीएफ कोचिंग स्कुल आणि एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर 10 वर्षाखालील पीएमडीटीए राज्य मानांकन टेनिस स्पर्धा व याच कालावधीत वरिष्ठ टेनिस स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, टेनिस विश्वाच्या पुनरागमनामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत असून पुणे आणि महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात पावसाळ्यापूर्वीपर्यंत पार पडणाऱ्या सलग स्पर्धांमुळे आमच्या खेळाडूंना लय गवसण्यासाठी व त्याचबरोबर लागोपाठच्या स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले मानांकन सुधारण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
स्पर्धेची यादी खालीलप्रमाणे: सोमवार, 18 एप्रिल, 2022 या आठवड्यात: 12 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 16 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा;
सोमवार, 25 एप्रिल, 2022 या आठवड्यात
18 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा;
सोमवार, 2 मे 2022 या आठवड्यात आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धा; 12 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा;
18 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा;
सोमवार, 9 मे, 2022 या आठवड्यात
14 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा;
सोमवार, 23 मे, 2022 या आठवड्यात
16वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा;
सोमवार, 30 मे, 2022 या आठवड्यात 14वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा;
सोमवार, 6 जुन, 2022 या आठवड्यात
12 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा;
16 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा.

