पुणे, दि.9 जून 2017ः पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशियाई 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात ऋतुजा चाफळकर हिने एकेरी व दुहेरी या दोन्हीं गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या गटात अर्जुन गोहाडने विजेतेपद मिळवले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलींच्या गटात ऋतुजा चाफळकरने आपली विजयी मालिका कायम ठेवत प्रियांशी भंडारीचा ६-१, ६-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. एकेरी गटाबरोबरच दुहेरीत ऋतुजा चाफळकरने वैष्णवी आडकरच्या साथीत प्रियांशी भंडारी व हृदया शहा या जोडीचा २-६, ६-४, १०-२असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ऋतुजा हि डिईएस स्कुलमध्ये आठवी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील चौथे विजेतेपद आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत भारताच्या अर्जुन गोहाड याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित शशिधर कोटाचा ६-०, ६-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अर्जुन हा अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आठवी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात सन्मय गांधी व धन्या शहा या जोडीने शशिधर कोटा व विशेष पटेल यांचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६(४) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व 200 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवक सेवा संचालनलायचे संचालक नरेंद्र सोपल आणि क्रीडा व युवक सेवा संचालनलायचे उपसंचालक आनंद वेंकटेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पीएमडीटीएचे कौस्तुभ शहा, एटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आणि प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: अंतिम फेरी: मुले: अर्जुन गोहाड(भारत)वि.वि.शशिधर कोटा(भारत,३)६-०, ६-१;
मुली: ऋतुजा चाफळकर(भारत)वि.वि.प्रियांशी भंडारी(भारत)६-१, ६-२;
दुहेरी गट: मुले: सन्मय गांधी/धन्या शहा वि.वि. शशिधर कोटा/विशेष पटेल ६-३, ७-६(४);
मुली: वैष्णवी आडकर/ऋतुजा चाफळकर वि.वि.प्रियांशी भंडारी/हृदया शहा २-६, ६-४, १०-२.