पुणे- गेली ४ महिने पुण्याला दिवसाआड अल्प पाणीपुरवठा होत असताना महापालिकेचे आयुक्त कुणालकुमार यांच्या कार्यालयाच्या खिडकीतून २२ मार्च रोजी घेतलेले हे छायाचित्र पहा . एकीकडे सर्व बांधकामांना पाणी बंद – शेतीलाही कधीच पाणी बंद झाले आहे … पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी … अशा अवस्थेत स्मार्ट पुणे करायला निघालेल्या या कुणालकुमार यांच्या कार्यालयाला लागुनच होत असलेल्या महापालिकेच्या विस्तारित बांधकामाला मात्र मुबलक पाणी उपलब्ध होत आहे …..
गेली प्रत्येक उन्हाळ्यात माध्यमे पाण्याची बिकट अवस्था वर्णन करतात .. गेली कित्येक वर्षे पुण्याला महापालिकेने प्रथम स्वतंत्र धरण बांधावे ,कात्रज येथील दोन्ही धरणांची तळे करून त्यांना पर्यटन केंद्रे बनविणाऱ्या महापालिकेने जागे व्हावे . एखाद्या वर्षी पाऊस नाहीच झाला तर.. पिण्याच्या पाण्यासाठी मारामाऱ्या होतील . पाण्यासाठी रक्त आटवून घेण्याची वेळ येवू नये असे माध्यमे वारंवार सांगत असताना ; पिण्याच्या पाण्याचा साठा वाढविण्यासाठी कुणाल कुमार तुम्ही केलत काय हो … ?
पुण्याच्या ज्या महिला महापौर होत्या ; ज्यांच्या घराण्याला शहिदांची परंपरा आहे; ज्या महिला खासदार आहात , त्यांनाच जर तुम्ही हेटाळत असाल तर सामान्य माणसांची काय गत असेल हो . . ?
तुम्ही वंदना चव्हाण यांना इमेल द्वारे पाठविलेल्या पत्रात काय म्हटले आहे …
तुमचा माझ्या कार्यक्षमतेवर कधीच विश्वास नव्हता . शहराच्या हितासाठी ठोस काम करण्याबाबत माझा नेहमीच आग्रह राहिला हे . पण तुमचा प्रतिसाद कधीच सकारात्मक नव्हता….
तुमच्या कार्यक्षमतेवर वंदना चव्हाण सोडा ;पुण्यातील नागरीकांचा तरी विश्वास आहे का हो ? आणि का ठेवावा तो त्यांनी ? शहराच्या हितासाठी कोणते ठोस काम आजवर तुम्ही केले आहे ? आपण आपल्या स्वतःच्या कल्पनेने येथील नागरिकांसाठी त्यांच्या कायम स्वरूपी फायद्याची कोणती गोष्ट आजपर्यंत करून ठेवली जी कायमची लक्षात राहील … ?
तुम्ही वंदना चव्हाण यांना या पत्रात असे हि म्हटले आहे …
माझ्या कारकिर्दीत अत्यंत उद्धट आणि सहकार्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये तुम्ही एकमेव आहात …महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे हि माझी अंतिम जबाबदारी आहे एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचा अजेंडा राबविण्यासाठी माझी नेमणूक झालेली नाही .
…. शहराच्या हिताचा तुम्ही निर्णय कोणता घेतला ? आणि कोणता प्राधान्यक्रम ठरविला हे जर रस्त्याने -किंवा घरोघरी जावून नागरिकांना विचारला तर कोणाला त्याचे उत्तर देता येईल काय ? रस्तो रस्ती कचरा दारो दारी कचरा .. प्यायला पाणी नाही ; इथले रेल्वेस्टेशन देखील सर्वात घाणेरडे म्हणून लौकिकास आलेले .. सार्वजनिक बससेवा कोणाला वापरावीशी वाटणार नाही अशी .. लोकांना महापलिकेत कोणते काम घेवून यायचे झाले कि नगरसेवकांना धरावे लागते ; नाहीतर ओळखी पाळखीने यावे लागते .
तुम्हीच आता तुमचे नियम तपासून पहावेत तुमचा प्राधान्यक्रम तपासून पहावा , तो शहराच्या कोणत्या नागरिकाला आजपर्यंत कामास आला … फायद्याचा ठरला ते सांगावे . इथे प्यायला पाणी नाही; कचरा उचलायची-त्याची विल्हेवाट लावायची तुमच्याकडे व्यवस्था नाही, आणि ताकद नाही , बेरोजगारांना तुमची साथ नाही . लघुशंकेसाठी नागरिकांना व्यवस्था नाही …. सुंदर शहराचे केवळ स्वप्ने दाखविणाऱ्या योजना आणून तुम्ही जाल निघून .. पण आजवर आहे त्या स्थितीत तुम्ही या प्राथमिक गरजांसाठी काय करून दाखविले हे अगोदर सांगा … अहो आडातच नाही तिथे पोहऱ्यात येणार कुठून ?
शहराच्या विस्तारला मर्यादा घालणारी योजना तुम्ही कधी राबविली ? पिण्याच्या पाण्याचा साठा वाढविण्यासाठी कोणती योजना सफल केलीत ? कचरा प्रश्न तुम्ही १०० टक्के सोडविलात … ? बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असे काही केलेत .. ?
आणि म्हणे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे माझी अंतिम जबाबदारी आहे … तुम्ही काय केलेत आहे ते रस्ते कॉंक्रीट करीत सुटलात .. बांधकामे आणि काँक्रिटीकरण याचाच आपल्या कारकिर्दीत जोरदार धडाका राहिला आहे .
अगोदर काही करून दाखविले असते तुम्ही …आणि नंतर स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले असते तर .. या स्वप्नावर हि विश्वास ठेवला असता .. आणि या योजनेतूनही पुण्याचे भले कराल अशी निश्चित आशा ठेवली असती … पण हि योजना अमलात यावी म्हणूनच आपण आपल्या कारकिर्दीत आटापिटा केलात हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे . आणि हि योजना भाजपची आहे हे सर्वांना ठावूक आहे . मग तुम्ही कसे म्हणता … मी कोणत्या पक्षाचा अजेंडा राबवायला नाही … तुमचा स्वतःचा कोणता अजेंडा नव्हता काय — आजवर राबवायला .. ?
वंदना चव्हाण यांचे इथे कौतुक नाही ,पण ते कुठे ना कुठे पुण्यात कधी न कधी होईल ही ;होत ही असेल पण हे लक्षात घ्या तुमचे तर अजिबातच कौतुक नाही ….. तेव्हा फुशारक्या सोडा आणि खरे आयुक्त असल्याचे दाखवून द्या … आम जनता होरपळते आहे बेरोजगारी..पाणी–कचरा … गरीबी अशा नानाविध समस्यांमध्ये … महापालिकेत प्रचंड ताकद आहे ती वापरा आणि जनतेचे भले करा .. असे केले तर जनता तुमच्या पाठीशी राहील तुमचे कोतूक करेल … अन्यथा .. जनतेला हि आता ठावूक झाले आहे…. मागे एक पोलीस कमिशनर होते जे दुचाकी स्वारांना रुमाल देखील तोंडाला बांधू देत नव्हते आणि कॉंग्रेसच्या गृहराज्यमंत्र्या ला पोलीस संरक्षण हि देत नव्हते . आता ते भाजपचे खासदार झाले आहेत .आता हेल्मेट आले आहे . केवळ भाजपच नव्हे तर असे खासदार राष्ट्रवादीत ही आहेत जे आय ए एस होते . पुण्याचे ज्यांना भले करायचे होते .. लोकांना मूर्ख बनवू पाहणाऱ्या अशा अधिकारांच्याच रांगेत तुम्ही सध्या दिसू लागला आहात हे ध्यानात घ्या. त्यातून बाहेर खरोखर पडा .. . पुण्याला धरण देवून — शहराच्या विस्तारा ला मर्यादा घालून… इथले प्रश्न सोडवा आणि मग व्हा महाराजे …


