पुणे-‘पाणी वाचवा ,कपात टाळा’चा संदेश महापालिका प्रशासनाला देत ,सोमवार पासून रोज तमाम पुणेकरांना .. पुण्यातील सर्व भागांना 5 तासाचा समान पाणीपुरवठा करणारे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे असे आज येथे महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरव राव यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
पाटबंधारे खात्याने १३५० एम एल डी पाण्याऐवजी पुणे महापालिकेला ११५० पाणी प्रतिदिनी देण्याचे निश्चित केले आहे . त्यानुसार महापालिकेने पाटबंधारे ला दिवाळी होऊ देत नंतर पाण्यात कपात करा असे सांगितले असले तरी त्यामागे पुणेकरांचे पाणी कपात करण्याचा कोणताही मनसुबा नाही , पुणेकरांना आज जेवढे पाणी मिळते तेवढेच पाणी पाटबंधारे ने कपात केल्यावरही मिळाले पाहिजे या साठी महापालिका प्रशासनाने मार्ग शोधला आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्र पाणी कालव्यातून जाते इथे आणि अन्य काही ठिकाणी पाण्याची गळती होते आहे . हि गळती रोखली तर पुणेकरांपर्यंत १३५० एम एल डी म्हणजे पुरेसे पाणी पोहोचू शकते असा सत्ताधारी आणि प्रशासनाचा दावा आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्र पाणी कालव्यातूनदेण्या ऐवजी ते बंद पाईपलाईन मधून दिले तर १५० एम एल डी पाण्याची गळती रोखली जाईल असाही त्यांचा दावा आहे . आणि हि गळती रोखल्याने १५० एम एल डी पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल . १५ नोव्हेंबर पर्यंत हि पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल आणि या प्रमाणे आपण आज हि काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाण्याच्या गळतीचा मागोवा घेवून उपाययोजना करीत आहोत असे यावेळी आयुक्तांनी सांगितले .
काही भागात २ तास काही भागात ८ तास असा विषम स्वरूपात पाणी पुरवठा सध्या होतो आहे . तो टाळून सर्वत्र 5 तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे असेही महापौर आणि आयुक्तांनी सांगितले.कोणत्याही परिस्थितीत पाटबंधारे ने जरी कपात केली तरी अशा मार्गाने पुणेकरांच्या पाण्यात कपात होऊ न देण्याचा निर्धार सत्ताधारी भाजप चे पदाधिकारी आणि प्रशासनाने केला आहे .