पुणे- पुण्यात भाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात असून मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव करा अशी मागणी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली .
महापालिकेतील जलपर्णी घोटाळ्यासंदर्भात आंदोलन करताना कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या चुकीचे मी समर्थन करणार नाही ,पण या संदर्भात संबधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगत विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात भाजप कडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला आणि मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव सरकारने करावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने अटकाव करू असा इशारा हि दिला ..नेमके विखे पाटील काय म्हणाले ते ऐका आणि पहा ….
मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव करा : विखे पाटील म्हणाले …
Date:

