पुणे – २४ तास पाणी योजनेच्या नावाने शेकडो कोटीचा झोल करण्याचा प्रयत्न टेंडर प्रक्रिया राबवितानाच महापालिकेत वारंवार होत असल्याचे खासदार संजय काकडे यांनी निदर्शनास आणून दिले असून , महापालिकेवर पालकमंत्री बापट यांचाच अंकुश आहे, आम्ही कार्यकर्ते आहोत , हा नेतृत्वाचा प्रश्न नाही तर पुणेकरांच्या पैशाचा हा प्रश्न आहे ,पुणेकरांचा एक ही पैसा अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने वाया जावू देणार नाही , आणि बापट हे देखील आपल्या भूमिकेशी सहमत आहेत असे स्पष्ट करत खासदार संजय काकडे यांनी आयुक्त कुणालकुमार यांच्या भुमिकेप्रकरणी संशय व्यक्त होईल अशी विधाने केलीत . याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे आणि ते यात निश्चित लक्ष घालतील असा विश्वास हि व्यक्त केला .