पुणे- नव्याने होऊ घातलेल्या सायकल आराखड्याच्या कामी स्टँप घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत बोलताना नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केला .
अविनाश बागवे यांनी सायकल आराखड्या मागे दडलेलं रहस्य उलगडल्या नंतर भैय्यासाहेब यांनी हा
‘स्टँप बॉम्ब’ उपस्थित करून सर्वांना धक्का दिला . ते म्हणाले , एक तर कमी रकमेचा स्टँप वापरला , आणि नंतर तो मुदत संपल्यावर दिला . शिवाय २०१६ च्या स्टँप पेपरवर २०१५ चा म्हणजे मागील तारखेचे अॅग्रीमेंट केले. त्यांच्या या वक्तव्याची सभागृहात गंभीर दखल विपक्ष् नेते चेतन तुपे यांनी घेतली . आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि सभापती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही तातडीने या विषयावर हस्तक्षेप करीत येत्या १८ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता महापालिका आयुक्त कुणालकुमार हे सायकल योजनेवर सादरीकरण करतील . तेव्हा या प्रकरणी सादरीकरण तसेच उपस्थित मुद्दे त्यांची उत्तरे यांची मिनिट्स लेखी नोंद ठेवली जाईल असे आश्वासन देण्यात आले .
सायकल आराखडा प्रकरणी भैयासाहेब जाधवांनी केला स्टँप घोटाळ्याचा आरोप (व्हिडीओ)
Date:

