पुणे- महापालिकेत आज झालेल्या विशेष सर्व साधारण सभेत भाजपकडून गणेश बिडकर, रघुनाथ गौडा, गोपाळ चिंतल, राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि काँग्रेसकडून अजित दरेकर या पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली. यामध्ये गणेश बिडकर यांनी भाजपकडून तर सुभाष जगताप यांनी महापालिकेची निवडणूक लढविली होती मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता .मात्र या दोन्ही पक्षांना यांची सभागृहात आपली बाजी भक्कम राखण्याकरिता गरज भासल्याने त्यांना पुन्हा सभागृहात पाठविण्यात आले आहे. गोपाळ चिंतल यांच्या पत्नी पूर्वी नगरसेविका होत्या तर अजित दरेकर हे देखील माजी नगरसेवक आहेत . पण यावेळी त्यांनी निवडणूक लढविली नव्हती .आणि सदैव पक्षाच्या कामात त्यांनी रस दाखविला होता .
मुख्य सभेत हा निवडीचा विषय दाखल होताच यावेळी विविध आक्षेप शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी घेतले. वास्तविक पाहता सर्व निवडी निवडणुकीची प्रक्रिया टाळून पालिकेतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळा च्या अनुषंगाने झाल्या आहेत. संख्याबळ अत्यल्प असल्याने कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्रितपणे चिठ्ठी टाकून एका सदस्याची निवड करायची ठरले होते मात्र चीठ्हीत अजित दारेकारांचे नाव निघल्यानंतर शिवसेनेने घुमजाव केला आणि कोर्टात ,तसेच महापालिकेत आक्षेप घेण्याचे सत्र राबविले.
आजच्या मुख्य सभेत शिवसेनेच्या आक्षेपांवर विधी सल्लागार थोरात यांनी धर्मादाय आयुक्तांकडून आलेल्या अहवालांची तसेच उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर झालेल्या निर्णयाची माहिती सभागृहात दिली
या नियुक्त करण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांचा महापौर मुक्ता टिळक यांनी सत्कार केला. विशेष म्हणजे या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय काकडे ,पालकमंत्री गिरीश बापट ,खासदार अनिल शिरोळे यापैकी कोणाच्याही नावांच्या घोषणा दिल्या नाहीत .मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांच्या प्रचंड घोषणा देत ..तेच आता पुण्याचे कारभारी असल्याचे संकेत आपल्या घोषणाबाजीतून दिले.