पुणे- टिळक मॅडम राजकारण आणि व्यवहार तपासून बघा,राजकारणासाठी मुंडे हटाव चा नारा देवून फायदा काय ?मुंडेंना हटवून पीएमपीएमएल फायद्यात येणार काय ?अशा मथळ्याखाली स्कूलबस दरवाढी चे स्पष्टीकरण थेट दुरचित्रवाहिन्यांना देण्यास वेळ असलेले पीएमपीएमएल चे संचालक तुकाराम मुंडे हे अधिकारी असल्याचा फायदा घेवून लोकप्रतिनिधींना बदनाम करून सवंग प्रसिद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप आता येथे होतो आहे .
महापौर टिळक यांना बदनाम करण्याचे राजकारण तर ते करीत नाहीत ना ?असा प्रश्न देखील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून विचारला जावू लागला आहे . वाहिन्यांना स्पष्टीकरण देण्यास वेळ आहे आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला वेळ नाही याचा अर्थ च मुंडे राजकारण करत असून , पुण्यातून अनेक अधिकारी आता पुढारी झाले आहेत . मुंडेंना पुढारी व्हायचेच असेल तर त्यांनी बिनदिक्कत थेट राजकारणात यावे .पण जनतेची सेवा आणि प्रश्न सोडविण्यासाठीच अधिकारी आणि पुढारी हि दोन्ही पदे आहेत हे लक्षात ठेवावे .आणि अधिकाऱ्याहून अधिक जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे … त्यांना अशा राजकारणी अधिकाऱ्यांकडूनही कामे करवून घ्यावी लागतात .असेही आता भाजपा च्या वर्तुळातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सूर दिसून येतो आहे .
महापौर टिळकांना बदनाम करण्याचे मुंडेंचे राजकारण ? …(व्हिडीओ)
Date:

