दिसताक्षणी मारून टाका –आदेश

Date:

पुणे : शहरात मोकट अथवा भटकी डुकरे दिसल्यास त्यांना ताबडतोप जप्त करून मारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका अधिनियमातील तरतूदीचा आधार महापालिका प्रशासनाने घेतला असून, महापालिकेकडून येत्या 10 सप्टेंबर पासून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर प्रकटन महापालिकेकडून देण्यात आले आहे.
शहरातील मोकाट डुकरांची समस्या गंभीर झाली आहे, त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडून वारंवार याबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेकडून डुक्करमुक्त मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी या पूर्वीच केली आहे. तसेच महापालिका हद्दीत डुक्कर पाळने हा अनधिकृत व्यावसाय असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने या मोहीमेसाठी जय्यत तयारी केली आहे.

त्या अंतर्गत पालिकेकडून नुकतेच एक जाहीर प्रकटन प्रसिध्दीस देण्यात आले असून त्यात महापालिका अधिनियम शेड्यूल चॅप्टर 14 (22) (3) मध्ये कोणतेही मोकाट डुक्कर शहरात भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल. आणि आयुक्त निर्देश देतील त्या प्रमाणे त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल. आणि अशा रितीने मारून टाकलेल्या कोणत्याही डुकरा बद्दल भरपाई मिळविण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही. त्यामुळे भटक्‍या डुकरांचा व्यावसाय करणाऱ्यांनी भटकी व मोकाट डुकरे त्वरीत महापालिका हद्दीबाहेर हलविण्यात यावी अन्यथा वरील प्रमाणे कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...