पुणे- दीपक मानकर यांच्यामुळे शिवसृष्टीचा निर्णय घेणे भाग पडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण त्यांना फसवलं गेलंय.. असे सांगत एकीकडे आमच्याशी 6 फेब्रुवारीला शिवसृष्टीबाबत बोलणी करून आश्वासन दिले आणि दुसरीकडे तातडीने ८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी …ज्यांनी जिजाऊमातेची बदनामी केली ,ज्यांनी जेम्स लेन ला मार्गदर्शन केले त्या बाबासाहेब पुरंदरेंना खाजगी शिवसृष्टीसाठी आंबेगाव ला जागा देण्याचा अध्यादेश काढून शिवप्रेमींवर च गनिमी कावा केल्याचा आरोप कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केला .
मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीबाबत मुंबईत घेतलेली बैठक म्हणजे मॅच फिक्सिंग आणि षड्यंत्र होते असेही त्यांनी म्हटले आहे . आम्ही शिवसृष्टी चांदणी चौकात व्हावी यासाठी आजच्या सभेतील उपसूचनेला पाठींबा देतो ..पण शिवतारे यांच्या सूचनेप्रमाणे बीडीपी ची अजमेरा बिल्डरची जागा मोकळी करायची होती काय ?असा सवाल करत 2 महिन्यात हि जागा ताब्यात घेतली तर आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयजयकार करू ..पण हि वेळ येणार नाही हे मला ठाऊक आहे …असे शिंदे म्हणाले .
आंबेगाव येथे पुरंदरे यांच्या संस्थेला जागा देण्याचा अध्यादेश काढल्याची माहिती सभागृहात देत त्यांनी ..मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली …पहा आणि ऐका त्यांचे भाषण जसेच्या तसे ….