पुणे-कोरोना विषाणू प्रादुर्भाव लढा हा वेगळा आहे. या शतकातील ही वेगळीच घटना आहे. या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे प्रतिपादन येथे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले .
करोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने अर्थात भारतीय सैन्य दलाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली.
पुणे मनपा अधिकारी, कर्मचारी संघटना, डॉक्टर्स, आरोग्यसेवक अशा विविध पातळीवर लढा देणारांचा सन्मान व मानवंदना देण्याचा गौरव सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला.
कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोना विषाणू प्रादुर्भाव बाधित मुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पित केली.
करोना विषाणू विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱयांना भारतीय सैन्यदल मानवंदना देत असल्याचे चित्र स्वरूप याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्यांचे वतीने केक आणण्यात आला होता.
याप्रसंगी सफाई कर्मचारी व डॉ. संजीव वावरे यांच्या हस्ते केक कापून सैन्य दलाचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सैन्य दलाने याप्रसंगी उपस्थितांना मिठाईचे वाटप केले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना मनपा कॉफी टेबल बुक व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुस्तक भेट दिले. अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना भारतीय राष्ट्रध्वज प्रदान केला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सबएरिया पुणेचे चीफ स्टेशन कमांडर ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी सांगितले की भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले की कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात देण्यात येत असलेला लढा अत्यंत महत्वपूर्ण आहे. या लढ्यात योगदान देणारे योद्धे, शासन यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्थातील सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, पोलिस कर्मचारी यांचा लढा अतुलनीय आहे. या लढ्यातील योद्धय्यांचे मनोबल उंचावण्याचा दृष्टीने त्यांचा सन्मान करणे, मानवंदना देणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण भारतभर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशावर संकटे आल्यावर धावून जाणे सैन्य दलाचे काम आहे. सैन्य दलाने लढा दिल्यावर नागरिकांनी सैन्य दलाची प्रशंसा केली व मनोबल वाढविले.
परंतु करोना विषाणू विरोधातील लढाई ही पूर्णपणे वेगळी आहे. जे लढत आहेत ते नागरिक आहेत. यामध्ये सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा विविध घटकांचा सहभाग आहे. पोलिस कर्मचारी घराबाहेर राहून लढत आहेत व आपले संरक्षण करीत आहेत. त्यामुळे अशा योद्ध्यांची प्रशंसा व मनोबल वाढविणे आमचे कर्तव्य आहे.
पुणे मनपाच्या कर्मचारी, अधिकारी यांची प्रशंसा करणे व मनोबल वाढविण्याची संधी पुणे मनपाने आम्हास दिल्याबद्धल त्यांनी आभार मानले.
या लढ्यात मनपाने सर्व स्तरावर प्रशंसनीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यामुळे मनपाचे आम्ही कौतूक करीत आहोत. या लढ्यात भारतीय सैन्य दल आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच या लढ्यात आपल्याला यश मिळेल.
या लढ्यातील मनपाच्या कार्यकर्तृत्वाला भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आम्ही सलामी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना मानवंदना दिली. मनपा आयुक्त गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १८९० ते १९१३ या कालावधीत प्लेग साथीचे रोगाने थैमान घातले होते त्यावेळी काही प्रमाणात उपचार व सावधानता यावर आधारित लढा देण्यात आला होता.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव लढा हा वेगळा आहे. या शतकातील ही वेगळीच घटना आहे. या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्धय्यांचे आभार मानण्याकरिता व त्यांचे खऱ्या अर्थाने मनोबल उंचावण्याकरिता केलेला सन्मान व दिलेली मानवंदना मनोबल उंचावण्यासारखी आहे. या कार्यक्रमाकरिता स्वतः ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी उपस्थित राहून आमचे मनोबल वाढविले आहे. मनपाचे वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “भारतीय सैन्य सीमेवर दिवस रात्र लढा देत आहेत व देशवासीयांचे संरक्षण करीत आहेत. या लढ्याबद्धल संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केलेल्या भावनेबद्धल आम्हीही सलामी देत आहोत.”
अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी केले व आभार प्रदर्शन अतिरिक्त मनपा आयुक्त शंतनू गोयल यांनी केले.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

