पुणे- महापालिकेच्या सभागृहातील धडाडणारी तोफ म्हणून अरविंद शिंदे ,चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप ,आबा बागुल ,अविनाश बागवे अशा नावांचा प्रामुख्याने उल्लेख होतो . आज हे नमूद करण्याचे कारण तसेच आहे . पीएमपीएमएल चे तुकाराम मुंडे कधी सभागृहात येतील आणि या तोफांच्या माऱ्याचा मुकाबला करतील … असा मुकाबला महापालिकेच्या मुख्य सभेच्या इतिहासात नोंदला जाणारा ठरेल काय ? मुंडे यांच्यात सभागृहात येण्याची हिम्मत आहे काय ? असे अनेक प्रश्न चर्चीले जात असतात .
आज हा विषय पुन्हा निघाला तो ..मुख्य सभेत आलेल्या
पीएमपीएमएल च्या विषयावरून …कदाचित धारूरकर सारखे जुने जाणते अधिकारी आले असते तर असा ऐरनीवर विषय कोणी आला नसता… पण मुंडे यांनी मुख्य सभेत पाठविलेले अधिकारी बिच्चारे कच्चे निघाले … अन घोटाळा झाला . त्यातील एक तर नुकतेच बदलून आलेले होते अन दुसरे जरी मुख्य लेखा अधिकारी असले तरी अपूर्ण तयारी अभावी कदाचित गांगरून गेलेले होते .
पीएमपीएमएलला येणाऱ्या तुटी मुळे महापालिका दरमहा १२ कोटीचा निधी पीएमपीएमएलला देते .त्यातील मासिक हप्ता १२ कोटीचा अदा करण्याबाबतचा हा विषय होता . अर्थात हि देय रक्कम मुख्यसभेने अडविली नाही संमत केली . पण पुढचा निधीचा हप्ता देण्यापूर्वी सीएमडी यांनी खूप चांगल्या योजना तुट कमी करण्यासाठी अंमलात आणल्या आहेत त्यांचे सादरीकरण करावे आणि त्याबाबतचा जुलै महिन्यातील अहवाल हि मुख्यसभेपुढे ठेवावा अशा उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे ….. पहा या प्रसंगाची ही पहावी अशी झलक .