पुणे-भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी तुकाराम मुंडे यांचा दरारा नाही तर ‘गब्बरसिंग ची ती दहशत आहे अशी टीका केली तर खास सभेच्या शेवटी सभागृहनेते असलेले भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी मुंडे यांचे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हटले आहे .तर सभेच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी स्वतः देखील मुंडे न सांगता निघून गेल्याचे स्पष्ट करीत त्यांचा निषेध करीतच सभा तहकूब केली
महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर सभेच्या शेवटी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि सभापती सिद्धार्थ धेंडे यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे …