पुणे-लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना आणि केलेल्या सूचनांना उत्तरे न देता पळून जाणे या कृतीने तुकाराम मुंडे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे ,आता त्यांना बडतर्फ कोण करणार ? असा सवाल विपक्ष नेते चेतन तुपे पाटील तसेच नगरसेवक प्रकाश कदम यांनी महापालिकेच्या खास सभेत बोलताना केला .
महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर यावेळी चेतन तुपे पाटील आणि प्रकाश कदम पहा आणि ऐका काय म्हणाले…