पुणे- तुकाराम मुंडे हि व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे आणि ती लोकशाहीविरोधी आहे अशा शब्दात नगरसेवक अविनाश बागवे यांनी खास सभेत टीका करत मुंडे यांच्या सभागृहातून निघून जाण्याच्या कृतीचा निषेध नोंदविला
महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर यावेळी नगरसेवक अविनाश बागवे पहा आणि ऐका काय म्हणाले