हडपसरच्या नव्या कचरा प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक संतप्त
पुणे-पुण्याचा कचरा नेमका टाकायचा कुठे? हा प्रश्न आता उग्र स्वरूप धारण करत असून त्याची जाणीव आज महापौर दालनात घडलेल्या तणावपूर्ण प्रसंगाने करून दिली आहे . हडपसरचा कचरा फक्त हडपसरमधील प्रकल्पा मध्ये हवा ,शहराचा नको , तुम्ही नारायण पेठेत कचरा प्रकल्प उभारा … कोथरूड मध्ये उभारा , हडपसरच का ? असा प्रश्न करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज महापौर दालनात पहा नेमके काय केले ?
हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आज महापौर मुक्ता टिळक यांना कचऱ्याची भेट देत हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला. हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे.यापूर्वीचे कचरा प्रकल्प हडपसर मध्ये आहेतच .
त्यामुळे मंगळवारी पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथील रॉकेम प्रकल्पात पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून गाड्या परत पाठवून स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी हडपसर येथे आंदोलन केले होते. महापौर दालनात या प्रश्नावरून नेमके काय घडले ते पहा जसेच्या तसे ….