पुणे- गरीब आणि गरजू रुग्णांना डायलेसिस चे उपचार करण्यासाठी 1 लाख रुपये खर्चापर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय आज दिवाळीच्या तोंडावर घेवून स्थायी समितीने गरीब रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे .त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना रोख रकमेच्या पारितोषिकात घसघशीत वाढ आणि महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन डिस्पोजल प्रकल्प अशा विविध निर्णयांबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली … पहा आणि ऐका नेमके मोहोळ यांनी काय सांगितले ….