पुणे- रस्त्यावर फिरून भिक मागणारी १० हजार मुले शिकवून मोठी करण्याचा निर्धार पुणे महापालिका आणि बजाज फौन्डेशन च्या सहाय्याने केल्याची माहिती उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यांनी येथे दिली .
मागासवर्गीय कल्याण निधी ची बैठक नवीन टर्म मध्ये पहिल्यांदाच झाल्याचे सांगून उपमहापौर धेंडे म्हणाले , आम्ही आता दोन नवीन प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर अंमलबजावणी सुरु करणार आहोत . ‘बार्टी’च्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करणे आणि रस्त्यावरची १० हजार मुलांचे शिक्षण , निवास आणि पालन पोषण अशी जबाबदारी स्वीकारणे . या वर्षी १२१ कोटी रुपये मागासवर्गीय कल्याण योजनांसाठी आर्थिक तरतूद असून , सध्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेणे आणि नवीन नवीन योजनाचे प्रस्ताव सदर करून त्यावर अंमल करणे यासाठी आता आम्ही प्रयत्नशील रहाणार आहोत . त्यासाठी मागासवर्गीय कल्याण निधी विभागाची दर गुरुवारी बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .
पहा नेमके उपमहापौर डॉ . धेंडे काय म्हणाले …..