झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केला तीव्र निषेध
पुणे-देशात राज्यात महागाई वाढल्यामुळे रोजगार हि नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पदपथावर स्टोल अथवा हातगाडी यांच्यावर छोटे व्यवसाय घटक उपजिवेविकेचे साधन म्हणून जगत असताना अतिक्रमणावर जबर दंडाचा इलाज दाखवून अतिक्रमण थोपविण्याचा या कारवाईचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी तीव्र निषेध केला आहे .
वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्याच्या नागरी भागात फेरीवाल्याच्या संदर्भात राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्या दृष्टिकोनातून नगर रचना विभागाचे आणि भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या पथ विक्रेत्याबाबतचे पथविक्रेत्याचा उपजीविकेचे रक्षण आदी नियम कायदा ५ मार्च २०१४ रोजी धोरणात्मक असलेला फेरीवाला पथारी कायद्याचा प्रामुख्याने निराधार महिला विधवा महिला मागासवर्गीय अपंग प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारातील असलेले तरुण तरुणींना प्राधान्याने वरील धोरणाने परवाना देण्याचे निश्चित केलेल्या कायद्याचे महापालिका दुर्लक्ष करीत आहे .
वरील धोरणानुसार परिसरात असणाऱ्या व्यवसायकांची पथधारकांची अर्ज व गणना करून नाममात्र दर घेऊन त्यांना परवाना व ओळखपत्र देण्याचे निर्देश आहे . ते निर्देश शहर सुधारणा समितीने न तपासता आणि अंत्यंत दुर्बल घटकातील पथव्यावसायिकांना अतिक्रमनाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा धोरणाच्या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . दहाहजार ते वीस हजार रुपयांचा दंड म्हणजे अट्टल गुन्हेगारामध्ये पथविक्रेत्यांच्या विरोधात असून त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी न करता व्यवसायिकांची स्थळे अद्यापही निश्चित झालेली नाहीत . त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख माधव जगताप हे अत्यन्त भांडवल व्यवसायिकाकडे असलेली मोठी अतिक्रमणे पाडण्यास त्यांचे धाडस होत नाही . पण रस्त्यावर बैठा पथारी व्यवसायिक हा अतिक्रमण म्हणून त्यांच्याकडे पाहून त्या गरीबाला मारण्याचे धोरण होत असल्यामुळे हि चिंतेची बाब बनली आहे . अशी माहिती भगवानराव वैराट यांनी या पत्रकाद्वारे दिले .


