पुणे- भिडे गुरुजी प्रकरण वारीत घडल्यानंतर आता जणू त्याचे राजकीय पडसाद हि उमटू लागले आहेत . वारकऱ्यांनी या कार्यकर्त्यांना वारीत आपले बस्तान बांधू न दिल्याने भाजपची काही मंडळी संतापली आणि त्यांनी राजकारण करीत पालिकेच्या सोयीसुविधांवर त्याचा राग काढला असा सूर आवळत भाजपविरोधी पक्षांनी उचल खाण्याचा प्रयत्न आज केला तर भाजपच्या वतीने मात्र हे विरोधकांचे राजकारण अयोग्य असल्याचा दावा करीत अशा राजकीय खेळ्या असभ्य असल्याचा दावा हि करण्यात आला आहे .
नेमके काय घडले पाहू या …
शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे पुणेकर नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. मात्र शहरातील पालखी मुक्कामी महापालिका प्रशासनाच्यावतीने मंडप आणि पाण्याची व्यवस्था केली नाही. या मुद्यावरुन पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत निषेधकरत शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी महापौर मुक्ता टिळक या प्रशासनास पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत सभा त्याग केला. याप्रकरणी राष्ट्रवादीनेही सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
सत्ताधारी भाजपकडून यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी केवळ ५६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालिकेने पालखीच्या काळात केलेले नियाजन अपुरे आहे, असे सांगत शिवसेना गटनेते संजय भोसले आणि कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभात्याग करणे पसंत केले. यावेळी राष्ट्रवादीकडूनही निषेध नोंदवण्यात आला. या सर्वसाधारण सभेनंतर विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, पालखी सोहळयापूर्वी दरवर्षी बैठक घेतली जाते. मात्र यंदा महापौरांनी तसे काही केले नाही. पालखी शहरात येण्यापूर्वी एक दिवस बैठक घेतली. हे केवळ दाखवण्यासाठी केले. महापौर आणि पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारकरी भाविकांना त्रास सहन करावा लागला.
प्रत्यक्षात आपण हि मुख्यसभा फेसबुक वरील मायमराठी च्या पेजवर पाहू शकाल जशीच्या तशी …
इथे
यासंदर्भात पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट