ठेकेदारामार्फत विविध खात्यात हे सुरक्षारक्षक गेल्याकाही वर्षांपासून महापालिका सेवेत कार्यरत आहेत. ठेकेदाराकडून वेळेवर वेतन न मिळणे, भविष्यनिर्वाह निधी ठेकेदारानेच लाटणे यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या सुरक्षारक्षकांच्या व्यथांकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने आता तडकाफडकी सुरक्षारक्षकांना काढून टाकल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाईल कि काय ? अशी शक्यता असल्याने याबाबत ओरडा झाल्याने दिवाळीनंतर हि पावले उचलण्याचे ठरले आहे . सध्या १८०० सुरक्षा रक्षक तैनात असून ९०० सुरक्षा रक्षकांचे टेंडर ‘राजा उदार झाला’ पद्धतीने म्हणजे ठेकेदारच मोठा कुबेर जणू आणि त्यांने केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून ‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने हे टेंडर भरल्याचे स्पष्ट झालेले आहे . अशा स्थितीत या ९०० रक्षकांचे पगाराचे पैसे दिल्यानंतर उर्वरित ९०० रक्षकांना द्यायला पालिकेकडे पैसे उरलेले नाहीत . त्यामुळे आपणास एवढ्या रक्षकांची गरजच नाही . केवळ १२०० रक्षक पुरेसे आहेत . अशी भूमिका घेत ६०० रक्षकांना घरी पाठविण्याचा मनसुबा पालिकेत रचला गेला आहे . कंत्राटी कामगार पद्धतीने कसा अत्याचार चालविला आहे याकडे देशातील एक उदाहरण म्हणून निश्चित पाहता येणार आहे .
पगार द्यायलाच पैसे नाहीत …महापालिका ६०० सुरक्षा रक्षकांना पाठविणार घरी …
पुणे -कंत्राटी पद्धतीने पुणे महापालिका सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या ६०० सुरक्षारक्षकांना कामचुकार संबोधून कामावरून काढून टाकण्याचा डाव पालिकेत रचण्यात आला आहे . पालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन या सर्वांना या प्रकारची माहिती असून ,पगार द्यायलाच पैसे नसल्याने खरे तर ही वेळ येवून ठेपली आहे. मात्र तसे कबूल न करता डच्चू देण्याचा घाट घातला जातो आहे . सध्या सुद्धा अनेकांचे तीन तीन महिन्यांचे पगार ठाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे .