पुणे- तुम्ही ऐकत नाही म्हणून आयुक्तांना सांगितले,तरीही काही होत नाही म्हणून महापौरांना सांगितले .. पण लक्षात ठेवा तुम्हाला चुकीचे सर्क्युलर आणून दिले , आमची ही पुढची पावलं तयार आहेत ,जी तुम्हाला खूप त्रासदायक ठरतील असा इशारा अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांना देत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या भूमिकेला सहमती दर्शविली . प्रत्येक वार्ड ऑफिसच्या क्षेत्रातील आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने असंख्य नगरसेवकानी याप्रकरणी तक्रारीचा सूर लावला होता . आणि मनमानी कारभाराचा आरोप लावला .अखेर या प्रकरणी सभापती म्हणून व्यासपीठावर असलेले उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यांनी या प्रकरणी महापौरांच्या दालनात उद्या सकाळी बैठक घेवून पुण्याच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत .