पुणे- महापालिकेचे करापोटीचे ४५२ कोटी ९० लाखाची रक्कम मोबाईल टॉवर उभारणाऱ्या बड्या कंपन्यांकडून येणे असून हि रक्कम थकीत ठेवायला कोणाकोणाचे अभय आहे ? असा सवाल महापालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी करत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा ला टार्गेट केले आहे. एकीकडे प्रत्येक लिटरमागे ४० रुपये लुबाडणाऱ्या आणि किरकोळ थकबाकीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या भाजपला हि थकबाकी का दिसत नाही ? का यांनी डोळ्यावर कातडे पांघरून घेतले आहे ? असा सवाल करीत या कंपन्यांकडून त्वरित थकबाकीची रक्कम कायद्याप्रमाणे तिप्पट दंड आकारून वसूल करा अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला आहे. पहा आणि ऐका नेमके चेतन तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे ….