मुख्यसभेतील आदेश ,चौकशी आणि अहवालांवर देखील संशयाचे ढग
पुणे- महापालिका मुख्यसभेतील आदेश,चौकशी आणि अहवालांच्या घोषणा आणि आश्वासने यावर आता विश्वास ठेवावा कि ठेवू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . गेल्या सहा महिन्यातील मुख्य सभांचा कारभार पाहता अनेकदा महापौरांसह आयुक्तांनी दिलेले आधेश,केलेल्या घोषणा हवेतच विरल्या . अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित होतात . तेव्हा तेव्हा त्याबाबत ठोस कारवाई चे सुतोवाच प्रशासनाकडून करण्यात येते. महापौर ही आदेश देताना दिसतात . पण प्रत्यक्षात दिलेली वेळ आजतागायत कधीही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे .
सीएसआर घोटाळा,बोगस कर्मचारी प्रकरण, जन्म मृत्यू दाखल्याचे गौडबंगाल, यासह अनेक प्रकरणी चौकशी कधी वेळेवर सुरु झाली नाही . जेवढ्या दिवसांच्या मुदतीत चौकशी सुरु करणे, अहवाल देणे ,कारवाई करणे याबाबत च्या घोषणा करण्यात आल्या त्या सर्वच फोल ठरल्या आहेत . कित्येकदा प्रशासनाला याबाबत विचारणा होऊनही त्याबाबतचे उत्तर प्रशासन देणार नाही अशी दक्षता जणू खुद्द सत्ताधाऱ्यांनीच घेतली आहे कि काय ? असे वाटण्याजोगी परिस्थिती सभागृहात दिसून आली आहे .
गेल्या 5 महिन्यांपूर्वी सभागृहात चव्हाट्यावर आलेला सीएसआर घोटाळ्याबाबत अजूनही सभागृहात खुलासा प्रशासनाने केलेला नाही ,गेल्या जुलै महिन्यात ,बोगस कर्मचारी प्रकरण, जन्म मृत्यू दाखल्याचे गौडबंगाल, सभागृहासमोर पुराव्यानिशी मांडूनही याबाबत चौकशी झाली की नाही ? दोषी अधिकारी कोण आहेत ?यांची नावे ही सभागृहात सांगण्यात आलेली नाही. आणि अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी देखील नाखुशी दाखविल्याचे दिसून आले आहे . या प्रकारामुळे एकूणच प्रकरणे बाहेर येवूनही सत्ताधारी पदाधिकारी त्यांना पाठीशी घालीत आहेत काय ? असा सवाल त्यामुळे साहजिक पणे उपस्थित होणार आहे . अधिकारी ,प्रशासन याहून मोठी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असल्याने या सर्यंचे खापर अर्थातच भाजपा वर फोडले जाऊ शकेल याची ही चिंता न करता कारभार केला जातो आहे .
कालच्या मुख्यसभेतील ‘गोलमाल’ पहाच …