पुणे- महापालिकेतील भाजपचे नगरसेवक गोपाल चिंतल यांनी परिस्थितीचे अगदी साजेसे वर्णन केले आहे ..अर्थात महापालिकेच्या खास सभेत आलेल्या पर्यावरण अहवालावर त्यांनी हि शायरी केली आहे …
पर्यावरण अहवाल खास सभेत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी सदर केला ,यावेळी चिंतल आणि राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी हा अहवाल म्हणजे कॉपी पेस्ट आहे असा आरोप केला .यावेळी दिघे यांनी हा २१ व अहवाल असून ,यातील काही संकल्पना सारख्याच असल्याचे म्हटले .तर पर्यावरण सुधारण्यासाठी काहीच करण्यात येत नसल्याची टीका सुभाष जगताप यांनी केली .