पीएनजी च्या सीएसआर मधून ६०० रेमडेसिव्हर मिळविले .

Date:

रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या कात्रज डेअरीची सिमाभिंतीसाठी महापालिका खर्च करणार १ कोटी ६ लाख रुपये

कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी कॉलेजसमोरचा पादचारी पुल पाडणार,

पुणे: यापूर्वी ८०० रेमडेसीवर इंजेक्शन मिळविल्यानंतर आता पु.ना .गाडगीळ सराफ यांचा सीएसआर फंड मिळवून त्यातून ६०० रेमडेसीवर इंजेक्शन थेट खरेदी करण्यात स्थायी समितीला यश आले आहे. पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडायला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महामेट्रोच्या कामात हा पुल अडथळा ठरत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी पाडावी लागणाऱ्या सीमाभिंती साठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे महानगरपालिके चे स्थायी समिती अध्यक्ष हेमंतरासने व नगरसेवक दिपकपोटे यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेस ६०० रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत.
सदर रेमडेसीवर इंजेक्शन हे पुनागाडगीळ ज्वेलर्स चे सर्वेसर्वा सौरभ गाडगीळ यांनी त्याच्या CSR फंडा च्या माध्यमातून ही मदत केल्या बदल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
तसेच सध्याच्या या अवघड परिस्थिती मध्ये इंजेक्शन चा तुटवडा भासत असताना त्रस्त पुणेकरांच्या भावनांची दखल घेत ही इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल व CSR फंड उपलब्ध केल्याबद्दल सौरभ गाडगीळ यांचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानले .
या प्रसंगी सभागृह नेते गणेश बिडकर ,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल , नगरसेवक अजय खेडेकर , नगरसेवक राहुल भंडारे,मेडिकल असोसिएशनचे अनिल बेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्वे रस्त्यावरील पादचारी पुल पाडणार

कर्वे रस्त्यावरील वाहतूक वाढली तशी नागरिकांना रस्ता क्रॉस करायला अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन कॉलेज ते कर्वे रस्ता पार करण्यासाठी पादचारी पुल बांधण्यात आला. पुण्यातील पहिल्या काही पादचारी पुलांपैकी हा एक पुल होता. आता या ठिकाणी महामेट्रोचे काम सुरु झाले आहे. तसेच नळस्टॉप चौकात फ्लायओव्हर देखील बांधण्यात येणार आहे. या कामांना या पुलाची अडचण होत असल्याने आज हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थायी समितीने या प्रस्तावाला आज मान्यता दिली. हा पुल आता महामेट्रो कडून काढुन सिओईपी हॉस्टेल समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

कात्रज डेअरी ते आंबेगाव पठार कडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

सातारा रस्त्याने कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनेकवर्ष प्रलंबित कामाला गती मिळणार आहे. कात्रज डेअरीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणामुळे पाडावी लागणारी सीमाभिंत बांधण्यासाठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यास मान्यता दिली आहे, कात्रज डेअरीकडून आंबेगाव पठारकडे जाणार्‍या एकमेव रस्त्याची रुंदी कमी आहे. विशेष असे की आंबेगाव पठार आणि तेथून पुढे आंबेगाव बुद्रुककडे जाणार्‍या वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने या रस्त्यावर सातत्याने गर्दी होते. 

२०१७ ला मंजुर करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता २४ मी. रुंद दर्शविण्यात आला आहे. या रुंदीकरणामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीचा सुमारे ४ हजार ४१० चौ.मी. भाग बाधित होणार आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये कात्रज डेअरीच्या ३१४ चौ.मी.च्या तीन बैठ्या इमारतींसोबतच संपुर्ण सिमाभिंत पाडावी लागणार आहे. या भिंतीचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार भिंत बांधण्यासाठी येणारा १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यासंदर्भातील प्रस्ताव आज स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...