पुणे- पालिका शाळेतील क्वारंटाइन मध्ये बिछाना ,जेवण यांची सोय नसणार असल्याचे महापालिकेने पीआरओ यांच्यामार्फत प्रसिद्धीस पाठाव्लेल्या संदेशातून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेच्या शाळेत क्वारंटाइन म्हणजे सारे काही वेळेवर आणि फुकट असे कोणी समजण्याची अवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हटले आहे पीआरओ संजय मोरे यांनी पहा वाचा जसाच्या तसा मेसेज …
शहरातील दाट वस्तीच्या नागरिकांची मनपा शाळेत तात्पुरत्या निवासाची व्यवस्था,
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शहराच्या दाट वस्तीच्या विशेषता: झोपडपट्टी व अधिक दाट लोकसंख्या परिसरातील घरात एखादी कोरोना विषाणू लक्षणे संशयित व्यक्ती,बाधित व्यक्ती,अशा व्यक्तीना विलगिकरन करणे,व पुढील उपचार करणे,या दृष्टीने तसेच या व्यक्ती, अथवा रुगणामुळे इतरांना बाधा होऊ नये,तसेच अशा परिसरात एका घरात अनेक व्यक्तींच्या रहिवासमुळे बाधा होणे,प्रादुर्भाव टाळण्याच्या व घरातील संबंधित व्यक्तीशी जलद उपाय होऊन प्रभावी उपाययोजना अंतर्गत घरातील निवास अडचणींचा विचार करता इतरांना अर्थात तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्था त्या परिसरातील पुणे मनपाच्या शाळेत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले,
मुखत्यवेकरून भवानी पेठ,बिबवेवाडी,कसबा विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता,येरवडा कळस धानोरी, परिसरातील दाट लोकवस्ती अर्थात पाटील इस्टेट, काशेवाडी, पर्वतीदर्शन,गुलटे कडी,लक्ष्मीनगर,लोहियांनगर,अशा भागात बाधित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे,
अशा दाट वस्तीच्या परिसरातील घरातून उपाययोजनेतर्गत सोशल distancing सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी किमान रात्री व दिवसा गरजेनुसार तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्यामुळे पुणे मनपाच्या शाळातून व्यवस्था ऊपलब्ध करून देण्यात येत आहे,
सदरच्या वरीलप्रमाणे दाट लोकवस्ती अथवा झोपडपट्टी नजीकच्या मनपा शाळेतून तात्पुरत्या करण्यात आलेल्या व्यवस्थेत ज्या नागरिकांना तात्पुरते दिवस व रात्री गरजेनुसार राहावयाचे आहे अशा नागरिकांनी स्वतःचे जेवण,बिछाना,स्वतः वापरावयाच्या मूलभूत वस्तू,यांची सोय स्वतः करावयाची आहे,या ठिकाणी फक्त राहण्याची व झोपण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
येथील सुरक्षा व्यवस्था,स्वच्छतागृह व्यवस्था,स्वच्छता,साफसफाई,निर्जंतुकीकरण,पिण्याचे पाणी ,विद्युतव्यवसथा,मनपाचे वतीने करण्यात येईल,
–संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
२४/०४/२०२०,

