पुणे -महानगरपालिका हद्दीतील मिळकतीवरील आकारण्यात येणाऱ्या मिळकत
करामध्ये स्वतः मिळकतदार राहत असल्यास अशा मिळकतीबाबत पुणे महानगरपालिका
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या मिळकत करात
४०% सवलत दिली जाते.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महसूलवाढ सुधारणा समितीची स्थापना
करण्यात आलेली असून नुकत्याच झालेल्या या समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला
कि, ज्या मिळकतदारांनी निवासी मिळकतींचा वापर स्वतासाठी करीत असल्याबाद्द्ल
४०% सवलत घेतलेली आहे. व तेथे स्वतः वापर न करता भाडेकरू ठेवलेले आहेत. अशा
मिळकतदारांची ४०% देण्यात आलेली मिळकतकरतील सवलत रद्द केली जाणार आहे.
या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले कि,
सरसकट सर्वच मिळकतदारांच्या मिळकतकरातील ४०% सवलत रद्द केली जाणार नसून
ज्या मिळकतीवर ४०% सवलत देऊन कर आकारणी केलेली आहे. अशा मिळकतीची कर
आकारणी विभागाचे वतीने शहरातील मिळकतीची पाहणी करण्यात येत आहे. ज्या
ठिकाणी मिळकतदाराने भाडेकरू ठेवलेले आहे. अशा भाडेकरू बाबत मिळकतदाराने
महापालिकेस कळविणे आवश्यक आहे. तसेच मिळकतींची माहिती घेण्यासाठी आलेल्या
मनपा कर आकारणी विभागाच्या सेवकांना त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
याबाबतची अधिक शहानिशा व वस्तुस्थिती तपासणीकरीता मनपा प्रशासनाने शहर
पोलिस विशेष शाखेला पत्र पाठवून त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंच्या कराराची माहिती
मागविलेली आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन
विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकतीची तपासणी करणार आहेत, तपासणी
करीत असताना सबंधित मिळकतीवर मिळकत करात ४०% सवलत घेतलेली असल्यास
तसेच सदरच्या मिळकतीचा वापर भाडेकरु करीत असल्यास देण्यात आलेली ४०% कर
सवलत रद्द करीत असल्याची अतिरीक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल
यांनी कळविले आहे.
भाडेकरु वापर करीत असलेल्या मिळकतीना ४० टक्के कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.
Date: