पाणी देण्याअगोदरच पाणीपट्टीदरवाढ वसुलीच्या प्रस्तावाला विरोध (व्हिडीओ)

Date:

पुणे- २४ तास पाणी पुरवठा करनार म्हणून गेली २ वर्षे सातत्याने दरवर्षी पाणीपट्टीत १५ टक्के दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला आज पुन्हा विरोध करत नगरसेवक अविनाश बागवे यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी मागणी केली . यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त पदावर असताना कुणालकुमार यांनी केलेल्या कारभारावर ताशेरे ओढले .सध्या पाणीपुरवठ्याची अवस्था पहा . दर आठवड्याला दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जातो . महापालिका २४ तास पाणी पुरवठा अजूनही करू शकलेली नाही . आणि गेली २ वर्षांपासून २४ तास पाणीपुरवठ्या च्या नावाखाली दरवर्षी १५ टक्के दरवाढ पाणीपट्टीत करते आहे . ज्या प्रस्तावानुसार हि दरवाढ केली  जाते त्या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली .खराडीतील आय टी कंपन्या आणि काही बिल्डर यांना करत सवलत देण्यासाठी गुपचूप अभय योजना राबविल्या गेल्याचा आरोप हि त्यांनी या वेळी केला. एकी कडे  सामान्य नागरिकांकडून दर वाढवून कर वसूल केला जात असताना पाणीपट्टी ची साडेपाचशे कोटीची थकबाकी सरकारी कार्यालयाकडे असल्याचे त्यांनी सांगितले . सरकारी कार्यालयेच अशा प्रकारे आदर्श घालून द्यायला लागल्यावर काय करायचे महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...