पुणे- महापालिकेने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मराठी बाणा हा जो कार्यक्रम साडेतीन लाखात होतो त्यासाठी अशोक हांडेंना अकरा लाख रुपये दिल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केला आहे.
पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सांगून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. यासाठी महापालिकेकडून पैशांची उधळ पट्टी करण्यात येत आल्याचा आरोप करत शिवसेनेने आज झालेल्या मुख्यसभेत अंदोलन केले. मात्र यावेळी सत्ताधारी भाजपने देखील पुढे येत परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे संख्येने कमी असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनांचा सत्ताधरी भाजपच्या घोषणांच्या आवाज पुढे आवाज दाबला गेला. (हे आंदोलन आपणास या https://www.facebook.com/MyMarathiNews/पेजवर लाइव्ह केलेले आहे ते पाहता येईल .)
दरम्यान या आंदोलनानंतर मीडियाशी बोलताना नगरसेवक संजय भोसले यांनी पहा आणि ऐका नेमके काय आरोप केलेत . त्यांच्याच शब्दात …..
अशोक हांडेंना साडेतीन लाखाच्याऐवजी दिले अकरा लाख ? (व्हिडीओ)
Date: