दहावी बारावीच्या एकूण ७८७९ विद्यार्थ्यांना महापालिकेने दिली १४ कोटी ची शिष्यवृत्ती …

Date:

पुणे- भारतरत्न मौलाना अबुल कलम आझाद अर्थसहाय्य योजना (इ.१० वी) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेच्या (इ.१२ वी)  शिष्यवृत्तीचे एकूण  ७८७९ विद्यार्थ्यांना एकूण  १४ कोटी ८लाख ५ हजार रुपये महापौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .(आर.टी.जी.एस. द्वारे पालकांच्या खात्यात जमा करण्यात आले. )
पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत भारतरत्न मौलाना अबुल कलम आझाद अर्थसह्य्य योजना (इ.१० वी) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना (इ.१२ वी) राबविण्यात येतात. पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ.१० वी व १२. वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपलिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विद्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण, तसेच ४०% अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतात. पात्र विद्यार्थ्यांना इ.१० वी साठी १५०००/- व इ.१२ वी साठी २५०००/- पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात मौलाना अबुल कलम आझाद अर्थसह्य्य योजना (इ.१० वी) ६९९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी पात्र ठरलेल्या ५६१७ तर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना (इ.१२ वी) २८७२विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी  २२६२ विद्यार्थ्यांना म्हणजे
एकूण ९८६२विद्यार्थ्यामधून पात्र ठरलेल्या ७८७९ विद्याथ्यांना हि शिष्यवृत्ती देण्यात आली.

त्यामधील ७८७९ लाभार्थी पात्र झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना दि. ०६फेब्रुवारी २०२० रोजी महापौर  मुरलीधर मोहोळ महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते एकूण रक्कम रुपये १४,०८,०५,०००/- आर.टी.जी.एस. (RTGS) करण्यात आले आहे. दि.०६फेब्रुवारी २०२० पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल. सदर कार्यक्रम प्रसंगी  आमदार श्री.सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष स्थायी समिती हेमंत रासने, सभागृह नेता  धीरज घाटे नगरसेवक सुशील मेंगडे,सुनील इंदलकर, समाज विकास विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर यांनी शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, व या शिष्यवृत्तीच्या रकमेचा पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच विनियोग करावा, असे आवाहन केले. पुढील आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीचे वितरण वेळेत करण्याच्या व शिष्यावृतीच्या रकमेच्या विनियोगाची खातरजमा करण्याच्या सूचना महापौर यांनी या प्रसंगी प्रशासनाला दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...