स्वच्छ पुण्यासाठी प्लॉगेथॉनमध्ये १ लाख ५ हजार ४१७ पुणेकरांचा सहभाग

Date:

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना व पुढाकार
पुणे (प्रतिनिधी) ‘पुणे हे माझे शहर आहे आणि ते मीच स्वच्छ ठेवणार’ या भावनेतून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या ‘पुणे महापौर प्लॉगेथॉन २०२०’ या उपक्रमाच्या निमित्ताने पुणेकर अक्षरशः एकवटले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेमध्ये पुणे शहराला अव्वल मानांकन मिळवून देण्यासाठी तब्बल १ लाख ५ हजार ४१७ पुणेकर पहिल्याच प्लॉगेथॉनमध्ये धावले आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धारही केला. उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात महापौरांनी सर्वांना स्वच्छतेसंदर्भात शपथ दिली.अशी माहिती महापालिका सहयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी माध्यमांना दिली .

माहिती देताना मोळक यांनी असेही म्हटले आहे कि,स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका प्रयत्न करीत आहे, त्याचप्रमाणे पुणेकर नागरिक देखील आपले पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसले. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी हजारोजण सकाळी जॉगिंग करतात. या जॉगिंगला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल, अशी महापौर मोहोळ यांची संकल्पना होती.

‘शहरातील एकूण ९८ मुख्य रस्ते, १७८ उद्याने एकूण ५०० मनपा-खाजगी शाळा अशा एकूण ७७६ ठिकाणी ‘प्लॉगेथॉन २०२० – मेगा ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले.
या प्लॉगेथॉनची सुरवात कर्वेपुतळा, कोथरूड येथून करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मोहोळ उपस्थित होते. महापौर मोहोळ यांनी ‘चला प्लॉगिंग करुया पुण्याला स्वच्छ ठेवूया’, या घोषणेने प्लॉगेथॉनची सुरवात करून पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत भारतामध्ये नंबर १ क्रमांकावर आणण्यासाठी हजारोच्या संख्येने प्लॉगेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व पुणेकरांना केले.

शहराच्या इतर भागात १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २४ हजार १७५ नागरिकांनी आपापल्या रहिवासी भागांत या प्लॉगेथॉनमध्ये सहभाग घेतला. यामध्ये स्थानिक नगरसेवक, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,बचत गट सदस्य आणि इतर प्रतिष्ठीत सदस्य यांचा सहभाग होता. तसेच सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्यासह गटनेते आणि नगरसेवकांनी आपापल्या निवासस्थानाजवळील प्लॉगेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदविला. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्वच्छ, जनवाणी, आदर पूनावाला क्लीन सिटी, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, सुप्रभात संस्था, झाशीची राणी बचत गट, मगरपट्टा मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, स्वराज मित्र मंडळ, अश्वमेध फौंडेशन, पुणे युथ घरट प्रकल्प, विविध स्थानिक बचत गट व गणेश मंडळे इ.च्या सदस्यांनी देखील सहभाग घेतला. तसेच शहरातील एकूण ५०० मनपा व खाजगी शाळांच्या परिसरात देखील याचप्रमाणे प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आला. यामध्ये एकूण ७५ हजार ६३२ शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. याचबरोबर शहरातील १७८ उद्यानांमध्ये देखील हास्य क्लबचे सदस्य, दैनंदिन वॉकसाठी येणारे नागरिक असे एकूण ५६१० नागरिकांनी उद्यानांमध्ये प्लॉगेथॉन ड्राईव्ह राबविला.
अशा प्रकारे संपूर्ण शहरात एकाच वेळी एकूण ७७६ ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आला असून यामध्ये एकूण १,०५,४१७ पुणेकरांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या संपूर्ण उपक्रमांतर्गत एकूण १९,८१५ किलो प्लास्टिक व इतर सुका कचरा संकलित करण्यात आला.
शहरातील विविध भागांतील प्लॉगेथॉनमध्ये सहभागी झालेले सर्व नागरिक, सभासद, मान्यवर व्यक्ती, मनपा अधिकारी/कर्मचारी यांनी भिडे पूल, डेक्कन जिमखाना येथे एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेऊन या संपूर्ण उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी .महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सौ.सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष  हेमंत रासणे, सभागृहनेते  धीरज घाटे ,जगदीश हिरेमणी,  अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल, ज्ञानेश्वर मोळक,  व मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे शहरात प्लॉगिंग ही संकल्पना ज्यांनी सुरु केली ते श्री.विवेक गुरव यांचा यावेळी .महापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित जगदीश हिरेमणी, सन्माननीय सदस्य, राष्ट्रीय सफाई आयोग व स्वच्छ सर्वेक्षण २०२० साठीचे पुणे शहराचे ब्रँड अॅम्बेसेडर श्री.महादेव जाधव यांचादेखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या प्लॉगेथॉन ड्राईव्हसाठी पुणेकर नागरिकांनी ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने एकजूटीने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे, त्याचे फलित म्हणून पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नक्कीच अव्वल मानांकन मिळेल असा विश्वास यावेळी महापौर यांनी व्यक्त केला.
पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : महापौर मोहोळ

पहिल्याच प्लॉगेथॉनला पुणेकरांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. ही प्लॉगेथॉन प्रातिनिधीक असली तरीआगामी काळातही पुणेकर याच भूमिकेत राहतील. स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असून स्वच्छतेसंदर्भात पुण्यात लोकचळवळ निर्माण होत आहे, हे आशादायी चित्र आहे. यात सहभागी झालेल्या प्रत्येक पुणेकरांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांना सहभागी होणे शक्य झाले नाही, त्यांनी आगामी काळात आवर्जून सहभाग नोंदवावा’, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...