पुणे- महापालिकेत विरोधी पक्षांच्या सभासदांनी सभात्याग केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी सभेत विविध विषय मंजूर करण्यास प्रारंभ केला . हे पाहून नगरसेवक अविनाश साळवे हे सभागृहात आले आणि त्यांनी सभेस आवश्यक असलेले कायदेशीर संख्याबळ आहे काय कोरम आहे काय असा मुद्दा उपस्थित केला . यावर सुमारे अर्धा तास नगरसचिव ,महापौर अगर कोणीही उत्तर दिले नाही . मात्र तोवर माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी खिंड लढविली . सभात्याग केल्यानंतर यांना परत येवून असे काही विचारता येत नाही असे म्हणत त्यांनी साळवे यांच्या मुद्द्याला हरकत घेतली .आणि त्यानंतर कामकाज ठप्प झाले. वेळकाढू पणा करताहेत आणि नगरसेवक बोलावून घेत आहेत असे मला समजते आहे असा आरोप यावेळी अविनाश साळवे यांनी केला .अखेरीस साळवे यांच्या मुद्द्याप्रमाणे नगरसचिव सुनील पारखी यांनी कोरम मोजला आणि ५६ आवश्यक आहे आता संख्या ५८ आहे असे सांगून हा मुद्दा संपुष्टात आणला.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/991887871170531/