https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/618396905633985/
पुणे-
24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर, रिंग रोड, जायका नदी सुधार योजना, जलपर्णी, कात्रज – कोंढवा रोड, टेंडरमध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी – शिवसेना – काँगेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले.
सुमारे 10 हजार कोटी रुपये घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे,नंदा लोणकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, नगरसेवक अविनाश बागवे, महेंद्र पठारे, नगरसेविका दीपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने या आंदोलनात सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/605499903553876/