पुणे :-तेरा लाखाच्या मोटारीला १ कोटी १० लाखात ‘देवदूत ‘बनवूनही कामाला आली नाही ,विविध मार्ग वापरूनही रस्ते खड्डेमुक्त होवू शकले नाहीत ,पावसाळ्यात भिंती,बांधकामे कोसळून दरवर्षी काहीजण हकनाक मरतातच कसे ? महापालिकेतील बोगस कामगार हटवून रिकाम्या जागा(रिक्त पदे) भराव्यात कशा ?पुणेकरांना २४ तास समसमान पाणीपुरवठा करावा तरी कसा ? या सर्वावर उत्तर शोधण्यासाठी आणि आता तोडगा काढण्यासाठी पुण्याचे महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे ,शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष तरुण तडफदार नगरसेवक सुशील मेंगडे तसेच अजय खेडेकर,दिलीप वेडे पाटील,राजा बराटे यांच्यासह १२ नगरसेवक स्वखर्चाने न्यूयार्क दौऱ्यावर आज पहाटे रवाना झालेत .त्यांना ओस्टन सिस्टर सिटी -मैत्री करारान्वये न्युयार्कच्या महापौरांनी दिलेल्या निमंत्रणावरून हि सारी मंडळी मोठी गुप्तता पाळून शहर हितासाठी स्वखर्चाने तातडीने रवाना झाली असल्याचे समजते .
खड्डे विरहीत रस्ते आणि आपत्तकालीन ‘देवदूत’कसा असावा यासाठी महापौरांसह १० भाजप नगरसेवक न्यूयार्क दौऱ्यावर
महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही या दौऱ्याबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे.सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उमेश गायकवाड, यांचा समावेश करूनही हे दौऱ्यात सहभागी झाले नसल्याचे वृत्त आहे. शहरात बेरोजगारी आणि वाढती वाहतूक अशा प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे .धरण भरूनही शहराला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे .महापौर पदाचा कार्यभार सांभाळून अडीच वर्षे झालीत या अडीच वर्षात महापालिकेच्या आपत्तीकालीन व्यवस्थे ने ‘देवदूत’ नावाच्या वाहनावर करोडोंची उधळण केली .हि चुकीची कि बरोबर याचा चौकशी अहवाल आला कि नाही आला हा गोंधळ कायम असताना हा दौरा सुरु झाला आहे .
भाजपची सत्ता आल्यानंतर काही उड्डाणपूल तयार झाले ,आता मेट्रो हि लवकरच सुरु होईल पण …कुठे तरी काही तरी चुकते आहे ..हे सारे करूनही वाहतूक समस्या मिटेल असे वाटत नाही ..यामागे नेमके काय रहस्य असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न न्यूयार्क मध्ये महापौरांच्या नेतृत्वाखाली हि नगरसेवकांची टीम करेल असे समजते आहे.