पुणे-
नागरी सुविधांबाबत अनेक प्रस्तावांना आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे शहरातील नळस्टॉप चौकामध्ये लॉ कॉलेज रोड, कर्वे रोड, म्हात्रे पुलाकडून येणारा रस्ता व पौड रोडवरून होणारी वाहतूक मिळते. यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या कर्वे रोड परिसरात निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नळस्टॉप येथे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रस्तावित असणाऱ्या वनज ते रामवाडी मेट्रो मार्गावर मेट्रो आणि या उड्डाणपुलाचे एकत्रित विचार करून पुलाची निर्मिती महामेट्रोने करावी आणि त्याचा खर्च पुणे महापलिका करेल, असा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरासह एकूण सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन येथे स्वच्छताविषयक कामे करण्याच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामासाठी दरमहा सर्वसाधारणपणे 1 लाख 20 रुपये खर्च येणार आहे. याविषयी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पहा आणि ऐका काय सांगितले ….
स्थायी समितीच्या सभेत अनेक महत्वाच्या विषयांना मंजुरी
Date:

