पुणे-मल्टिफ्लेक्स आणि मॉल च्या इमारतीतील पार्किंग च्या जागेचा व्यवसायिक वापर करणे म्हणजे पार्किंग शुल्क घेणे कायद्याचा भंग करणारेच असून जर मल्टिफ्लेक्स ला विनामुल्य पार्किंग तर महापालिकेच्या नाट्यगृहांना देखील पार्किंग विनाशुल्क ठेवा अशी भूमिका जर मराठी चित्रपट महामंडळ घेत असेल तर ती चुकीचीच आहे ,आणि मल्टिफ्लेक्स चालक मालकांना सहाय्य करण्यासाठी विषयाला वळण देण्याचा प्रयत्न करणारीच ठरेल असा आरोप महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी केला आहे.
या उलट आपण मुख्यमंत्री यांना हि राज्यभर अशा कायद्याचा आधार घेवून मॉल ,मल्टिफ्लेक्स येथील पार्किंग विनाशुल्क करावे यासाठी विनंती केली असून मुंबई महापालिकेने देखील या बाबीकडे लक्ष द्यावे अशी आदित्य ठाकरे यांना विनंती ट्वीट द्वारे केली आहे .असेही त्यांनी स्पष्ट केले .
पुण्यात वाढती वाहने, आणि पार्किंग ची समस्या आता उग्र बनली आहे. वाहने पार्क करायची कुठे ? असा प्रश्न आ वासून उभा आहे .असे असताना जिथे कायद्याने पार्किंग विनाशुल्क आहे तेथील मॉल आणि मल्टिफ्लेक्स मध्ये पार्किंगच्या नावाने नागरिकांची लुटमार होते आहे . मल्टीफ्लेक्स आणि मॉल अशा दोन्ही प्रकारच्या इमारती व्यावसायिक स्वरुपात मोडतात. आणि कायद्यानेचं अशा इमारतीत तिथे येणाऱ्या ग्राहकांना मग तो खरेदी करणारा असो वा खरेदी परवडणारी नाही म्हणून परत जाणारा असो ,अशा ग्राहकांना येथे पार्किंग विनाशुल्क करण्याची सुविधा दिलेली आहे. या बाबीकडे आजवर कोणी लक्ष का दिले नाही हा प्रश्न आहेच .पण आता तरी ही बेकायदा होणारी लुटमार थांबविली पाहिजे या हेतूनेच आपण निर्णय घेवून प्रशासनाकडे अशा संबधितांवर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत .आणि प्रशासनानेही तातडीने याबाबत दाखल घेत संबधितांना नोटीसा बजावल्या आहेत .यामुळे नागरिकांत देखील समाधान दिसून येते आहे . लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. असे असताना एका वृत्तपत्रात आपण चित्रपट महामंडळाने घेतलेल्या भूमिकेबद्दल बातमी वाचली . महामंडळ अध्यक्षांनी असे म्हटले आहेकी जर मल्टिफ्लेक्स चे पार्किंग विनाशुल्क करणार असाल तर महापालिकेने आपल्या नाट्यगृहांचे पार्किंग हि विनाशुल्क करावे . मला वाटते हि भूमिका मल्टिफ्लेक्स धार्जिणी अशी चुकीची भूमिका आहे.मल्टिफ्लेक्स हे व्यावसायिक आहेत .तिथे काय किमती कशाच्या आकारल्या जातात यावर हि अनेक प्रवाद आहेत .आणि कायद्यानेच तेथील पार्किंग साठी शुल्क आकरणी ची परवानगी नाही . राहिला महापालिकेच्या नाट्य गृहांचा प्रश्न तर ..महापालिकेची नाट्य गृहे म्हणजे पैसा कमाविण्यासाठी उभारलेली व्यापारी संकुले नाहीत हे संबधितांना समजत का नाही ? नाट्यकलेची जोपासना आणि सेवा करण्यासाठी अशी नाट्यगृहे नाटकांसाठी नाममात्र दरात वर्षानुवर्षे महापालिकेने उपलब्ध करवून दिलेली आहेत आणि अजूनही देत आहेत. त्यातून कोणताही नफा मिळविण्यासाठी ,धंदा करण्यासाठी महापालिकेने हि नाट्य गृहे उभारलेली नाहीत .नाटक जगले पाहिजे ,नाट्य कला जगली पाहिजे म्हणून असंख्य मान्यवर कलावंत देखील नाममात्र मानधनात नाटकात कामे करतात आणि जे यावर बोलतात त्यांनी हि नाममात्र दरातच नाट्यगृहे वापरली असतील .त्यामुळे नाट्यगृहे हे रंगदेवतेची रसिकांची सेवा म्हणून उभारलेली आहेत .तिथे महापालिकेने पार्किंग शुल्क घेणे अजिबात चुकीचे नाही व कायद्याच्या विरोधात नाही . हे माहिती असूनही कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी , विषय भलतीकडेच वळविण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर करू नये अशी आपली विनंती असेल.
व्यावसायिक इमारतीचे पार्किंग ग्राहकाना विनाशुल्क उपलब्ध करून देणे हाच कायद्याचा हेतू असून तो पाळलाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि राहू असेही बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान पालिकेच्या नाट्यगृहावर आधीच कोणताही नफा न मिळविता अधिक खर्च करावा लागतो आहे, जर नाट्यगृह पार्किंग निशुल्क केले तर थिएटर भाड़े वाढवावे लागेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.