पीएमपीएमएल चा वार्षिक तोटा आता 275 कोटीवर पोहोचणार …?

Date:

पुणे -२०१८ -१९ मध्ये २४४ कोटीचा तोटा आलेल्या पीएमपीएमएल चा तोटा नव्या सुरु झालेल्या आर्थिक वर्षात 275 कोटीपर्यंत पोहोचला तर नवल वाटणार नाही अशी स्थिती स्पष्ट दिसते आहे.म्हणजे दिवसाला सुमारे पाउन कोटी रुपये पुणेआणि पिंपरीकर पीएमपीएमएलला संचालन तुट म्हणून देतील याकडे आता लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे .

पीएमपीच्या संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण, प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात नाहीत, अशी टीका नगरसेवकांनी पीएमपीवर केली. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी तूट वाढण्याची कारणे विषद केली आहेत .सीएनजी बसेस ची देखभाल दुरुस्ती महागड़ी,सीएनजी आणि डिझेल च्या दरात होणारी वाढ..लाईफ संपलेल्या बसेसच्या दुरुस्तयांवर होणारा जादा खर्च .. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पीएमपी बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. पर्यायाने तूट वाढत आहे, असे त्यांनी मुख्य  सभेत सांगितले.

प्रवाशांची संख्या घटली
पीएमपीचे वर्षभरात प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे ३९ कोटींनी उत्पन्न घटले आहे. तसेच जाहिरात, इमारत भाडे, पुणे दर्शन बससेवेचेही उत्पन्न घटले आणि इंधनाचा खर्च वाढल्याने वर्षात २०१८-१९ मध्ये पीएमपीच्या संचलनातील तूट २४४ कोटींवर गेली आहे. २०१७-१८ मध्ये ही तूट २०४ कोटी होती, असे गुंडे यांनी सांगितले.

पीएमपीला एप्रिल ते जुलै दरम्याच्या संचलनातील तुटीपोटी ४८ कोटींच्या खर्चास मान्यता दिली. या वेळी नगरसेवकांनी पीएमपी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. तसेच तोटा कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न विचारला.

गुंडे म्हणाल्या, ”पीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या आहेत. तसेच वर्षभर ठेकेदाराच्या ५६ बस रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. बसच्या फेऱ्या ८५ हजार किलोमीटरने कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न बुडाले आहे. स्वारगेट ते निगडी आणि कोथरूड ते रामवाडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बस पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे त्या दूरवर उभ्या कराव्या लागतात. सीएनजी गॅस भरण्यासाठी बसना लांब जावे लागते. त्यामुळे डेड किलोमीटर वाढत आहे. अशा कारणांमुळे संचलनातील तूट वाढत आहे.”

पाच वर्षांतील पीएमपीची वाढलेली तूट
२०१४-१५ १६७ कोटी
२०१५-१६ १५७ कोटी
२०१६-१७ २१० कोटी
२०१७-१८ २०४ कोटी
२०१८-१९ २४४ कोटी

पीएमपीत येणार १६४० बस
पुणे महानगर परिवहन मंडळातील (पीएमपी) अनेक बस जुन्या झाल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी व प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन बस खरेदी केली जाणार आहे. २०२०-२१ पर्यंत नवीन १ हजार ६४० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभेमध्ये गुंडे यांनी बस खरेदीचा कालबद्ध कार्यक्रम नगरसवेकांना सांगितला. केंद्र शासनाच्या नॅशनल इलेक्‍ट्रिक मोटारव्हेईकल मिशननुसार २०३० पर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व बसेस इलेक्‍ट्रिक असणार आहेत. त्यादृष्टीने पीएमपी पुढील वर्षभरात ५०० इलेक्‍ट्रिक बस घेणार आहे. त्यातील २५ बस सध्या धावत आहेत. १२५ बसची ऑर्डर दिली असून, त्यातील ७० बस जुलै, तर ५५ बस ऑगस्टमध्ये येतील. ४०० सीएनजी बसपैकी जून-ऑगस्टमध्ये प्रत्येकी ५०, तर सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी १०० बस घेण्यात येणार आहेत. ४४० सीएनजी बस भाड्याने घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, चार निविदा आल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र शासनाकडून इलेक्‍ट्रिक बससाठी ५५ लाख रुपये अनुदान मिळत आहे, ३५० बस घेण्यासाठी केंद्राकडे या महिन्याअखेर प्रस्ताव पाठवला जाईल. इतर ३५० बस घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, त्या पुढच्या डिसेंबरमध्ये येतील. अशा प्रकारे नवीन बस खरेदीचे नियोजन केले आहे. या सर्व बस २०२०-२१ पर्यंत रस्त्यावर धावतील. त्यामुळे पीएमपीचे ९० टक्के प्रश्‍न सुटतील. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल, असे गुंडे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...