महाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार …?

Date:

पुणे-महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने प्रशासनातील काही अधिकारी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीतून आज महाराष्ट्राचे राज्य पुष्प असलेले ताम्हण हे फुल झाड पुण्यातून हद्दपार झाले आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .या पार्श्वभूमीवर ‘चला पुणेकरांनो लावू या किमान अडीच लाख झाडे’अशी साद महापालिकेच्या प्रशासनाच्या सहाय्याने घालून पुण्यातील १८५ उद्यानांमध्ये ताम्हण वृक्ष लावण्याचा  निर्धार हि या बैठकीतून महापालिका प्रशासनाने केल्याची माहिती येथे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी येथे दिली .
या वेळी नेमके त्यांनी काय सांगितले ते ऐका त्यांच्याच शब्दात ..
पण तत्पूर्वी वाचा  ताम्हण नेमके काय आहे …

ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्‍नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे कोकणात या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असे म्हणतात.

ताम्हण वृक्षाची पाने
ताम्हण वृक्षाची फळे

कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते.

झाडाची अन्य नावे

मराठी – मोठा बोंडारा
इंग्रजी – क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप
हिंदी – जरूल, अर्जुन
बंगाली – जारूल, अजहार
लॅटिन – लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी

बहरण्याचा हंगाम

पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते.

फुलाचे वैशिष्ट्य

हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (काँट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्‍चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते

झाडाची संरचना

खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.

उपयोग

झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खार्‍या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...