महापालिकेत शिवसेनेच्या हातावर तुरी -प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी पहा कोण कोण नगरसेवक पुढे …

Date:

पुणे -लोकसभेला शिवसेनेचे सहाय्य घेतले आता महापालिकेतील पदांच्या वाटपात शिवसेनेला त्याचा मोबदला दिला पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या हातावर  भाजपने ‘तुरी’ठेवल्या आहेत .दरम्यान आज नगरसचिव सुनील पारखी यांनी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली .9 प्रभाग समिती साठी प्रत्येकी 1/1 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर 6 ठिकाणी प्रत्येकी २/२ उमेदवारी अर्ज दाखल झाले .सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ”शिवसेनेला आम्ही एक समिती देता येणार होतो , तशी चर्चा देखील झाली; पण शिवसेनेने त्यांचा निर्णय कळवला नाही, त्यामुळे आमचे उमेदवार जाहीर करण्यात आले.”दरम्यान शिवसेनेची मात्र चार प्रभाग समित्यांवर अध्यक्ष पद मिळावे अशी मागणी होती .

महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने शिवसेनेचा महिला बाल कल्याण समितीचा हट्ट फेटाळला आणि क्रीडा किंवा विधी समिती घ्या असे सांगितले पण विषय समित्याचे वाटप यातच फिसकटले .नंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. आता भाजपच्या ताब्यात येणाऱ्या अकरापैकी चार प्रभाग समित्यांची मागणी करीत, भाजपची अडवणूक केली. मात्र, सभागृहातील तुटपुंज्या ताकदीची जाणीव करून, भाजपने या सर्वच जागांवर आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन होण्याची शक्‍यता फारच धूसर झाली आहे.

दरम्यान, येरवडा प्रभागात तीन नगरसेवक असल्याने प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ मिळण्याची शक्‍यता असतानाही शिवसेनेने मात्र आपला उमेदवार दिला नाही. महापालिकेत विषय समित्यांसह प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप- शिवसेनेची युती असल्याने चारपैकी एक विषय समिती देण्याबाबत भाजप नेत्यांनी शिवसेनेशी चर्चा केली होती. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने युतीनंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बेबनाव उघड झाला. विषय समित्यांचा वाद ताजा असतानाच प्रभाग समित्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरूनही भाजप- शिवसेनेत मतभेद सुरू झाले आहेत.

भाजपकडे ११ प्रभाग समित्या जाण्याची शक्यता 
महापालिकेच्या विषय समित्यांसह १५ प्रभाग समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यासाठी निवडणूक होत आहे. सभागृहातील संख्याबळानुसार १५ पैकी ११ समित्या भाजप, तर तीन समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. एका प्रभाग समितीसाठी चिठ्ठी काढण्यात येईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी होती. ही प्रक्रिया पूर्ण झाली .

  •  क्षेत्रीय कार्यालयाची नावे आणि त्यापुढे अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे पहा 

औंध बाणेर -ज्योती कळमकर

शिवाजी नगर;घोले रोड -आदित्य माळवे

सिंहगड रोड -नीता दांगट

वानवडी;रामटेकडी – रत्नप्रभा जगताप

कोंढवा;येवलेवाडी- मनीषा कदम

कसबा ;विश्रामबागवाडा -स्मिता वस्ते

बिबवेवाडी – प्रवीण चोरबोले

येरवडा -मारुती सांगडे

कोथरूड -छाया मारणे

नगर रोड -सुमन पठारे ,मुक्ता जगताप

ढोले पा. रोड- मच्छिंद्र गायकवाड ;मंगला मंत्री

सहकार मगर :धनकवडी -युवराज बेलदरे ,दिशा माने

वारजे :कर्वेनगर -लक्ष्मी दुधाने ,जयंत भावे

हडपसर;मुंढवा -पूजा कोंढरे ,उज्वला जंगले

भवानी पेठ -वनराज आंदेकर ;सुलोचना कोंढरे

 

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...